Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र आंदोलनाचा भडका, बंदची हाक; नाशिकमध्ये फाडले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर

आंदोलनाचा भडका, बंदची हाक; नाशिकमध्ये फाडले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर

Subscribe

नाशिक : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. नाशिकमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या असून संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या माध्यमातून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या दोन्ही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रयांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टरही फाडण्यात आले.रविवार ३ सप्टेंबर रोजी मराठा संघटनांनी नाशिक बंदची हाक दिली आहे.

शिंदे, फडणवीस सरकार मुर्दाबाद, मराठाव्देषी फडणवीस यांचा निषेध असो, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, जय जिजाउ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले यावेळी मेहेर चौकात आंदोलन करण्यात येउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स फाडण्यात आले. यावेळी आंदोलकांनी टायर जाळण्याचाही प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.

- Advertisement -

तर दुसरीकडे स्वराज्य संघटनेच्यावतीने राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आले. यावेळी समाजातील काही बांधवांनी मनोगत व्यक्त केली व सर्वांनी शासनाचा धिक्कार करून जोरदार निषेधाच्या घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजू देसले,शिवाजी मोरे,केशव गोसावी ,ज्ञानेश्वर थोरात,उमेश शिंदे,डॉ रुपेश नाठे ,आशिष हिरे ,नितीन दातीर,सागर पवार,योगेश नाटकर ,गणेश कदम ,राम खुर्दळ संजय फडोळ,विशाल वारुळे,संदीप लभडे,सचिन आहिरे, अमित नडगे ,प्रफुल पवार,सचिन शिंदे,पुंडलिक बोडके, भारत पिंगळे ,दिनेश नरवडे ,योगेश कापसे ,योगेश गांगुर्डे ,यश बच्छाव ,तुषार भोसले,कोटकर ज्ञानेश्वर शुभम महाले ,भूषण देसले,अजय कडभाने ,ऍड अजिंक्य ,विशाल कदम,नारायण भोसले,सखाराम गव्हाणे, रतन नवले आदि उपस्थित होते.

आगामी निवडणूकीत सरकारला धडा शिकवू

मराठा समाजाला डिवचण्याचे काम फडणवीस सरकारने करू नये. आम्ही ३२ टक्क्यांपेक्षा अधिक आहोत त्यामुळे आगामी निवडणूकीत सरकारला निश्चित धडा शिकवू. राज्यातील १५० पेक्षा अधिक मराठा आमदार आणि मंत्री भुजबळ यांना आव्हान देतो की मराठा समाजाला डिवचण्याचे काम करू नका. ओबीसी आमचे बांधव आहेत. परंतू नेत्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. जालन्याच्या पोलिस अधिक्षकांचे निलंबन करावे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या नितीन रोटे-पाटील यांनी केली.

पोलिस यंत्रणा अर्लट

- Advertisement -

जालना घटनेनंतर राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा अर्लट झाली असून शहरातील काही भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच पोलिसांची गस्त देखील वाढविण्यात आली आहे.

- Advertisment -