घरमुंबई'माथेरानची राणी' जाणार पावसाळी सुट्टीवर

‘माथेरानची राणी’ जाणार पावसाळी सुट्टीवर

Subscribe

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेनची सेवा बंद

नेहमीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करता माथेरानच्या ट्रेनची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी यंदाही पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात येणार आहे. येत्या ७ जून शुक्रवारपासून बंद करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

माथेरान ते अमन लॉजपर्यंत शटल सेवा सुरू

पावसाळ्यादरम्यान नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा जरी बंद करण्यात येणार असली तरी, माथेरान ते अमन लॉज पर्यंत असणारी शटल सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा पुर्णतः हिरमोड न होता माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणाऱ्या सेवेचा प्रवाशांना आनंद लुटता येईल.

- Advertisement -

यावेळी दोन तासाच्या मिनी ट्रेनची नेरळपासून सुरू होणारी सेवा डोंगरदऱ्यातून अमन लॉजपर्यंत पोहचताना वळणदार मार्ग असून सुरक्षिततेच्या हेतूने ही मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


हे ही वाचा – सलग दुसऱ्या दिवशी मध्यरेल्वे विस्कळीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -