घरमुंबईवैद्यकीय व दंत पदव्युत्तर पदवी प्रवेशप्रक्रिया १० फेब्रुवारीपासून

वैद्यकीय व दंत पदव्युत्तर पदवी प्रवेशप्रक्रिया १० फेब्रुवारीपासून

Subscribe

वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने बनवण्यात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमुळे वेळापत्रक जाहीर करण्यात विलंब झाला आहे.

राज्यभरातील 57 वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शासकीय जागा 1 हजार 349 आहेत, तर खासगी 428 आहेत. दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 380 जागा आहेत. या जागांवर प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. नीट आणि पीजी या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात उत्तीर्ण उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व उमेदवारांची गुणवत्ता यादी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्यामुळे राज्यातील प्रवेश प्रक्रियेचेही संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी कक्षाने तयार केले आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे, तसेच मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात दाखल याचिकांसदर्भात निर्णय लागल्यावर सरकारकडून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

असे आहे संभाव्य वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी – 10 ते 28 फेब्रुवारी
ऑनलाइन नोंदणी व शुल्क – 10 ते 28 फेब्रुवारी
प्राथमिक गुणवत्ता यादी – 6 मार्च, सायंकाळी 5 वाजता
कागदपत्रे पडताळणी – नीट एमडीएस – 7 ते 12 मार्च
नीट पीजी – 13 मार्च ते 20 मार्च
अंतिम गुणवत्ता यादी – 22 मार्च
पसंतीक्रम नोंदणी पात्र उमेदवार – 7 मार्च ते 20 मार्च
पसंतीक्रम बदलण्याची संधी – 21 मार्च ते 27 मार्च
पहिली प्रवेश पात्र यादी – 4 एप्रिल
पहिल्या यादीनुसार प्रवेश – 12 एप्रिल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -