घरमुंबईआता औषधांवर मिळणार ४० टक्के सवलत

आता औषधांवर मिळणार ४० टक्के सवलत

Subscribe

दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयाच्या धर्तीवर आता औषधांवर ४० टक्के सवलत मिळणार आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी येत असतात. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या या रुग्णांमध्ये गरिबांची संख्या अधिक असते. त्यामुळे जास्त किमतीच्या गोळ्या खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या धर्तीवर वाजवी दरात औषधे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

‘अमृत फार्मसी’ अभिनव उपक्रम

गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या धर्तीवर ‘अमृत फार्मसी’ अभिनव उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या ‘अमृत फार्मसी’मध्ये गरीब रुग्णांना केवळ ४० टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. हे औषधांचे दुकान रुग्णालय आवारात उभारण्यात येणार आहे. त्यामुळे याचा अनेक गरीब रुग्णांना फायदा होणार आहे. बऱ्याचदा काही औषधे बाहेरील फार्मसीमधून घ्यावी लागतात, ही औषधे महागडी असतात, अशा स्थितीत आता सर्व औषधे सवलतीच्या दरात रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

लवकरच होणार सुरु

देशातील अन्य काही राज्यांमध्ये असा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्या धर्तीवर पूर्णपणे जेनेरिक औषधे या औषध भंडारमध्ये मिळतील. या माध्यमातून लोकांना ब्रँडेड औषधांना पर्याय उपलब्ध होईल. शिवाय, आरोग्यसेवेतील औषधांचा खर्च तुलनेत कमी होईल. महापालिका रुग्णालयांच्या आवारात प्रायोगिक तत्वावर हे औषध भाडांर सुरु होईल, असे महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – 26/11 : पोलीस जिमखान्यावर फक्त मुख्यमंत्रीच; उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रायडंटमध्ये!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -