घरमुंबईमुंबई विद्यापीठाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

मुंबई विद्यापीठाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा

Subscribe

बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसमावेशकता या तत्वाचा अवलंब करत तळागळातील सर्वसामान्यांना संधी देऊन लोक घडवल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आभासी पद्धतीने आयोजित स्मृतिगंध कार्यक्रमात मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्यांप्रतीची भूमिका, विविध क्षेत्रातील योगदान, समाजकारण आणि राजकारण याचा आढावा घेत बाळासाहेबांची शिक्षणाप्रतीची आग्रही भूमिका विशद केली. विकासाची कास धरणारे बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले असून महिला सक्षमीकरणासाठीही त्यांनी विशेष योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचा चौफेर व्यासंग, लेखन, उत्तमोत्तम साहित्याचे वाचन हे अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसमावेशकता या तत्वाचा अवलंब करत तळागळातील सर्वसामान्यांना संधी देऊन लोक घडवल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले. तसेच वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा त्रिवेणी संगमाचे प्रतिभावंत आणि अलौकीक व्यक्तिमत्वाचे धनी असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे विद्यापीठातील अध्यासन केंद्राला शासनाच्या मदतीने सर्वोतोपरी अर्थसहाय्य केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नेतृत्वगुण विकासाला चालना मिळावी यासाठी स्थापन केलेल्या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रमांना सुरूवात झाली असल्याचे राज्याचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेल्या या अध्यासन केंद्राची व्याप्ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग केंद्रापर्यंत वाढवण्यावर भर देणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

नवदुर्गा पुस्तकातून बाळासाहेबांना आदरांजली

बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंताची विविध विषयांवरील नऊ व्याख्याने आयोजित केली होती. त्यांच्या व्याख्यानातील सार पुस्तकरुपाने प्रकाशित करण्यासंदर्भातील संकल्पना अधिसभा सदस्या डॉ. सुप्रिया करंडे यांनी मांडत ती पूर्णही केली. ‘नवदुर्गा’ हे पुस्तक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना पुस्तकरुपी आदरांजली असल्याचे डॉ. सुप्रिया करंडे यांनी सांगितले. नवदुर्गा या पुस्तकाचे वितरण राज्यातील सर्व ग्रंथालयात केले जाणार असल्याचेही यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -