घरमुंबईम्हाडाच्या कार्यकारी अभियंताला लाच घेताना अटक

म्हाडाच्या कार्यकारी अभियंताला लाच घेताना अटक

Subscribe

मरीन लाईन्स येथील चंदनवाडी परिसरामध्ये असलेल्या म्हाडा कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याला कार्यालयात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

मुंबईतील मरीन लाईन्स येथील चंदनवाडी परिसरामध्ये असलेल्या म्हाडा कार्यालयातील कार्यकारी अभियंता सूर्यकांत शंकरराव देशमुख यांना बुधवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्याच कार्यालयात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. एकवीस हजार रुपयांची लाचेची मागणी करुन वीस हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ३३ वर्षांचे हे कंत्राटदार आहेत. म्हाडाच्या अनेक इमारतीची कंत्राटे त्यांना देण्यात येतात.

बिलाबाबत म्हाडा कार्यालयातून प्रतिसाद नाही

काही महिन्यांपूर्वी त्यांना भांडुपच्या सोनापूर, एस. एस. लेन परिसरातील सेस इमारतीच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळाले होते. ते काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी चंदनवाडीच्या म्हाडा, सी विभागात कामाचा अहवाल सादर करताना त्यांचे आठ लाख रुपयांचे बिल सादर केले होते. मात्र या बिलाबाबत म्हाडा कार्यालयातून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी म्हाडाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना देशमुख यांनी बिलाची दोन टक्के म्हणजे १६ हजार आणि व्हिजिलन्सचे ५ हजार रुपये असे एकवीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

- Advertisement -

अधिकार्‍यांनी म्हाडा कार्यालयात सापळा रचला 

चर्चेअंती त्यांनी त्यांना वीस हजार रुपये देण्याचे मान्य केले. लाचेची ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सूर्यकांत देशमुख यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी सकाळी या अधिकार्‍यांनी म्हाडा कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाचेची रक्कम एका खाजगी कंत्राटदाराकडून घेताना सूर्यकांत देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. कार्यालयातच लाचेच्या गुन्ह्यांत अटक झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -