घरमुंबईम्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार?

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार?

Subscribe

म्हाडाच्या घरांच्या किंमत कमी व्हावी यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात म्हाडाच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

सामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडे पाहिलं जातं. पण हीच म्हाडाची घरं आता आवाक्याबाहेर जात असल्यानं लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहायाला मिळत आहे. ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून म्हाडा घरांची सोडत काढतं. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट अशा विविध गटांमध्ये ही म्हाडाची सोडत निघते. पण, त्याची किंमत परवडत नसल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत. काही जण तर घर लागल्यानंतर देखील परवडत नसल्यानं घर घेणं टाळत असल्याचं दिसून आलंय. घरांच्या या किमती आता सामन्यांच्या आवाक्याबाहेर याव्यात यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जात आहेत. ५ नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या १३८४ घरांची सोडत निघाली त्यामध्ये ४४ घरांची किंमत ही १ करोडपेक्षा देखील जास्त असल्याचं समोर आलं आहे. यानंतर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि चीफ एक्सझ्युकेटिव्ह ऑफिसर मिलिंग म्हैसकर यांना देखील पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किमतीसंदर्भात मत मांडण्यात आलं आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी केल्यास त्याचा फायदा हा अधिक लोकांना घेता येईल असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सध्या म्हाडाविचार करत असल्याची माहिती देखील यावेळी चव्हाण यांनी दिली.

२०१७ साली ३६ जणांनी घरं परत केली. तसेच परळमधील ३६ पैकी २८ जणांनी घरं परत केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार का? शिवाय, त्याचा फायदा किती जणांना होणार यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.

वाचा – म्हाडाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -