घरताज्या घडामोडी"अखेर सोनू सूदला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला"; संजय राऊत यांचे खोचक ट्विट

“अखेर सोनू सूदला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला”; संजय राऊत यांचे खोचक ट्विट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता गेल्या काही काळापासून स्थलांतरीत मजुरांना घरी पोहोचवत असून तो प्रसिद्धिच्या शिखरावर आहे. सोनू करत असलेले कार्य शासकीय यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय शक्य नसून भाजपने सोनूच्या कार्याला पाठबळ दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख सोनू सूदला घेऊन मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी सोनूने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची देखील सुद्धा भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खोचक ट्विट करत सोनूवर निशाणा साधला आहे.

सामना दैनिकात संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून सोनू सूदवर टिकास्त्र सोडले होते. सोनू सूद लवकरच भाजपचा स्टार प्रचारक झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सोनूवर आणखी आरोप केले होते. हे आरोप होत असताना महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांनी ट्विट करत सोनू सूदची बाजू मांडली तसेच त्याला घेऊन मातोश्री देखील गाठली. यावर संजय राऊत यांनी पुन्हा खोचक ट्विट केले.

- Advertisement -

 

- Advertisement -

भेटीनंतर काय म्हणाला सोनू सूद?

ते मला सपोर्ट करत आहेत. ज्यांना आमची गरज आहे तिथे मी पोहोचत राहिन. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे सर्व पक्ष सपोर्ट करत आहेत. आमच्या काहीही गैरजसमज नाही. जो काही होता तो दूर झाला आहे, असे भेटीनंतर सोनू सूद माध्यमांशी बोलताना म्हणाला.

 

सोनू सूदवर काय केली होती टीका?

‘सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा परत्न करीत होते. भाजपमधील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील’, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -