कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

kannada actor chiranjeevi sarja passes away at a private hospital in bengaluru
कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीव सरजा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो अवघ्या ३९ वर्षांचे होते. बंगळूरु मधल्या रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्याला श्वासचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा निधन झाले.

माहितीनुसार, चिरंजीव सरजा याने २००९ मध्ये ‘वायूपुत्र’ या चित्रपटातून अॅक्टिंग करायला सुरुवात केली. २० हून अधिक चित्रपटात त्याने काम केलं आहे. ‘अम्मा आय लव्ह यू’, ‘राम लीला’, ‘चंद्रलेखा’, ‘चिरु’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. ‘शिवार्जुन’ हा १२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला त्याचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. साउथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता अर्जुना सरजाचा भाचा आणि अॅक्शन हिरो राजकुमार ध्रुव सरजाचे भाऊ चिरंजीव सरजा.

तेलुगू अभिनेता अल्लू सिरीश याने चिरंजीव सरजा याच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्याने लिहिले की, ‘कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर धक्का बसला. तो फक्त ३९ वर्षांचे होते. या दुःखात मी त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.’


हेही वाचा – ‘राज तिलक’ चित्रपटाचे निर्माते अनिल सुरी यांचे निधन