घरमुंबईभिवंडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

भिवंडीत अत्याचाराच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली झाली असून दोन तरुणींवर बलात्कार केल्याच्या घटना घडलयाचे उघडकीस आले आहे.

भिवंडी शहर परिसरात महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भिवंडी शहरात एका पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली असून दुसऱ्या घटनेत एका १६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

भिवंडीत आतेभावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या पाच वर्षीय मुलीला तुला काही तरी सांगायचे आहे, अशी बतावणी करून तिला बिल्डिंगच्या जिन्याखाली नेवून अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी सीतामडी बिल्डिंग,वळगांव येथे घडली आहे. या अत्याचार प्रकरणी भुपेंद्र उर्फ भोजू विजयप्रकाश दुबे ( १६ ) आणि त्याची आई पुनमदेवी दुबे ( ३५ ) या दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अत्याचारी भुपेंद्र याने पाच वर्षीय मामाची मुलगी हि त्याच्या घरी आली असता त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलगी सायंकाळी घरी आल्यावर तिला वेदना असह्य झाल्याने ती रडू लागली त्यावेळी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता झालेला प्रकार तिने आईला सांगितल्याने तिला या घटनेने धक्काच बसला. याबाबत मुलीच्या आईने नणंदेला जाब विचारला असता तिने या अक्षम्य घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन अत्याचारी भुपेंद्र आणि त्याची आई पुनमदेवी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच दोघेही मायलेक फरार झाले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करीत आहे.

- Advertisement -

तर दुसऱ्या घटनेत फुलेनगर – १ येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय युवतीला फूस लावून बीड येथे पळवून नेवून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अत्याचारी कुंदन बबन डोळस आणि त्याचे आईवडील चिंदाबाई डोळस, बबन डोळस या तिघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कुंदन डोळस याने फुलेनगर येथील नातेवाईकांकडे पाहूणे म्हणून येऊन शेजारच्या युवतीशी प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिला फूस लावून मानखुर्द ,मुंबई येथे आणि त्यानंतर खडकी देवळा ,बीड येथे नेवून आईवडिलांच्या मदतीने तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर तिला ऊसतोड कामासाठी जुंपून तिचे शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून अखेर युवतीने भिवंडी गाठून अत्याचारी कुंदन आणि त्याच्या आईवडिलांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास अधिकारी एपीआय रोहिणी सोनार यांनी कुंदन यास अटक करून आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असून २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


वाचा – एचआयव्हीग्रस्त महिलेवर सायन हॉस्पिटलमध्ये बलात्कार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -