घरमुंबईअजिनोमोटोवर बंदी घालण्याची आमदारांची मागणी

अजिनोमोटोवर बंदी घालण्याची आमदारांची मागणी

Subscribe

अजिनोमोटोवर कायमची बंदी घालून शाळा आणि कॉलेजच्या बाहेर निकृष्ट दर्जाचे आणि स्वास्थ्याला हानीकारक पदार्थ विकणाऱ्यांवर अजामीनपत्र कारवाई करा, अशी मागणी भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांनी केली.

राज्यात ठिकठिकाणी शाळा आणि कॉलेजच्या बाहेर उघड्यावरचे खाद्यपदार्थ विकले जातात. यामध्ये काही ठिकाणी चायनीजचे पदार्थही विकले जात आहेत. या चायनिजमध्ये अजिनोमोटो मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अजिनोमोटोमुळे सुरुवातील विविध आजार होऊन नंतर त्याची परिणिती कॅन्सरसारख्या भयानक आजारात होते. त्यामुळे अजिनोमोटोवर कायमची बंदी घालून शाळा आणि कॉलेजच्या बाहेर निकृष्ट दर्जाचे आणि स्वास्थ्याला हानीकारक पदार्थ विकणाऱ्यांवर अजामीनपत्र कारवाई करा, अशी मागणी भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. या लक्षवेधीला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, अजिनोमोटो हा पदार्थ बेकायदीशीर नाही त्यामुळे त्यावर बंदी घालता येणार नाही, असे सांगितले.

शाळा आणि कॉलेजच्या बाहेर तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जाते. ती तात्काळ बंद करण्यात यावी असा मुद्दा तमिल सेल्वन आणि मनिषा चौधरी यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना जयकुमार रावल म्हणाले की, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहीरात, प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) कायदा, २००३ ची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये तंबाखू नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामध्ये ११ विविध विभागातील अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि अधिकारी वर्ग नसल्यामुळे कारवाई करण्यामध्ये अनेच अडचणी येत असल्याची कबुली देखील जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. अधिकारी वर्ग मिळावा यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याचेही जयकुमार रावल यांनी सांगितले. तर शाळा आणि कॉलेजबाहेर तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा अजित पवार यांनी केली. कडक शिक्षा देत असाल तर विरोधक देखील पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -