घरमुंबईराष्ट्रवादीशी युती झाल्यास ठाणे मनसेकडे

राष्ट्रवादीशी युती झाल्यास ठाणे मनसेकडे

Subscribe

ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा

काँग्रेससह महाआघाडी आणि सेना-भाजपाची युती यावर सध्या सर्वत्र जोरदार खलबते सुरू आहेत. कोणाची कोणाबरोबर युती आहे हे लवकरच जाहीर होईल. मात्र सध्या प्रत्येक पक्ष आपल्या काही राखीव जागांबद्दल आग्रही भूमिका घेत आहे. त्यात मनसेने ठाण्यासाठी आग्रह धरल्याचे समजते आहे. राष्ट्रवादी-मनसे युती होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मात्र मनसेला लोकसभेच्या ठाणे, नाशिक आणि दादरची जागा हवी असल्याने हा तिढा सोडवण्यासाठीच पुढच्या आठवड्यात शरद पवार ठाण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात एका वेगळ्याच समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. मागील काही महिन्यात शरद पवार  आणि राज ठाकरे यांच्या झालेल्या भेटीगाठीवरून ही युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येणार्‍या लोकसभेमध्ये मनसेची तीन ते चार जागांची मागणी असली, तरी राष्ट्रवादी मात्र एक-दोन जागांवरच सकारात्मक आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जवळपास तयार असून केवळ ठाण्याच्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र महाराष्ट्रातल्या ठाण्यासह आणखी दोन जागांची मागणी मनसे करीत आहे.  त्यात ठाण्याचा वरचा क्रमांक आहे. तर त्यानंतर नाशिक आणि दादरच्या जागेचा समावेश आहे. ठाण्याची जागा मनसेसाठी सोडली जाऊ शकते. सध्या तरी हे सगळे चर्चेच्या पातळीवर आहे.

- Advertisement -

मनसे जर आघाडीच्या गोटात सामील झाली, तर निवडणुकीची रंगत अधिकच वाढू शकते. ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या वर्षी मनसेच्या दहिहंडी कार्यक्रमात हजेरी लावून पुढे होणार्‍या राजकीय समीकरणाची नांदी दिली होती. त्यानंतर पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची प्रकट मुलाखती निमित्ताने एकत्र आले होते. याशिवाय माझा महाराष्ट्र माझे व्हिजन’ या कार्यक्रमाला येताना दोघांनी एकत्र विमानप्रवासही केला होता. तर नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने पवार कुटुंब मुंबईत आले होते. येणार्‍या काळात मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरणार का? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

लोकसभेसाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. बुथनिहाय कार्यकर्त्यांची तयारीही ठाणे जिह्यात सुरू झाली आहे. निवडणुकीत कोणी आमच्याबरोबर आले तर ठीक नाही तर त्यांच्याशिवाय मनसे निवडणूक लढवेल. मनसे प्रमुख आदेश देतील, त्याचे पालन आम्ही करू. – अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष मनसे 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -