घरमुंबईठाण्यात छटपूजेवरून मनसेचा हल्लाबोल

ठाण्यात छटपूजेवरून मनसेचा हल्लाबोल

Subscribe

13 नोव्हेंबरला उत्तर भारतीय लोकांचा छटपूजा उत्सव आहे. छटपूजा हा उत्सव उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नेपाळ अशा भारतातील पूर्व भागात साजरा केला जातो. उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे आता मुंबई-ठाण्यातही मोठ्या प्रमाणावर छटपूजा करण्यात येते. ठाण्यातील उपवन, मासुंदा, रायलादेवी, खारीगाव तलाव तसेच अन्य तलावांच्या काठी छटपूजा केली जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात हार, फुलं आणि इतर साहित्य वापरलं जातं. मात्र पूजा झाल्यानंतर हे साहित्य तसंच सोडून दिलं जातं. यामुळे ते निर्माल्य कुजून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र पर्यावरण नियामक मंडळाकडे केली आहे.

गणेशोत्सव, दहीहंडी तसेच नवरात्रोत्सव आले की ठाणे महापालिकेकडून प्रदूषण, सुरक्षा, पाण्याचा अपव्यय इतर कारणे देत मराठी सणांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला जातो. दहीहंडीत पाणी वापरू नका, डीजे लावू नका, गणेशोत्सवात विसर्जन तलावात करू नका. मात्र छटपूजा तलावात तसेच परिसरात साजरी करण्यास परवानगी कोण देतो. छटपूजेच्या निमित्ताने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले जाते. तलाव परिसरात अस्वच्छता पसरते. निर्माल्य इतरत्र कसेही टाकले जात असताना कोणीही का बोलत नाही? त्यांच्यावर नियम कायदे का लागू होत नाहीत? याबाबत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी राज्यकर्ते गप्प का, असे सवाल मनसेने उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

फक्त मराठी सणांवरच नियमांची जबरदस्ती का? गणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते त्याच धर्तीवर छटपूजे करता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. दरवर्षी ज्याप्रमाणे गणपतीविसर्जनाला तलावात बंदी करण्यात येते त्याप्रमाणे छटपूजेलाही बंदी करण्यात यावी. जेणेकरून पर्यावरण संवर्धन करता येईल. पर्यावरणाचा विचार करता सर्वांसाठी एकच नियम लागू करण्यात यावा. तसे पत्र आम्ही महाराष्ट्र पर्यावरण नियामक मंडळाला दिले आहे.
-दिपक विठ्ठल जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -