घरमुंबईकाशीनाथ घाणेकर नाट्यगृतील गैरसोय आठ दिवसात दूर करा; अन्यथा आंदोलन छेडू

काशीनाथ घाणेकर नाट्यगृतील गैरसोय आठ दिवसात दूर करा; अन्यथा आंदोलन छेडू

Subscribe

काशीनाथ घाणेकर नाट्यगृतील गैरसोय आठ दिवसात दूर करा अन्यथा आंदोलन छेडू असा इसारा मनसेकडून देण्यात आला आहे.

अभिनेता भरत जाधव यांनी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटयगृहातील गैरसोयी फेसबुकच्या माध्यमातून चव्हाटयावर आणल्यानंतर मनसेने आक्रमक होत पालिकेत धाव घेतली आहे. ठाणे महापालिकेचे साडेतीन हजार कोटीचे बजेट असताना एक सुसज्ज नाटयगृह देऊ शकत नाही, याबद्दल मनसेने तीव्र निषेध केला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात या गैरसोयी दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनमधील ऐसी केला बंद

काशिनाथ घाणेकर नाटयगृहात शनिवारी ‘सही रे सही’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाटयगृहातील एसी बंद असल्यामुळे रसिकांसह कलाकार घामाघूम झाले होते. यासंदर्भात तक्रार करूनही व्यवस्थापक कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अभिनेता भरत जाधव यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्याने खळबळ उडाली. त्यामुळे सोमवारी मनसेचे ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी महापालिकेत धाव घेतली. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट न झाल्याने मनसेने अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी मनसैनिकांनी त्यांच्या केबीनमधील एसी बंद केला आणि त्यांना नाटयगृहातील एसी बंद असेल तर कस वाटेल? याचा अनुभव आणून देत त्यांना सवाल देखील विचारला आहे. अभिनेता भरत जाधव यांच्या पोस्टमुळे ठाण्याची लाज वेशीवर टांगली आहे. ठाणे हे कलाप्रेमींचे शहर म्हणून ओळखलं जाते. पालिकेला शाळेत हँडवॉशसाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. एका नगरसेवकाच्या प्रभागात शंभर कोटीची कामे केली जातात. पण नाटयगृह सुसज्ज करण्यासाठी निधी नाही. याविषयी जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – सावित्रीबाई फुले नाट्यगृह सुरु करण्याकरता मनसेचा पालिके विरोधात निषेध


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -