घरमुंबईअभिजीत पानसेंचा अपमान; मनसेच्या जिव्हारी!

अभिजीत पानसेंचा अपमान; मनसेच्या जिव्हारी!

Subscribe

'ठाकरे' चित्रपटाच्या 'प्रिमियर शो'ला गेल्यावर दिग्दर्शक अभिजीत पानसेंना बसायला जागा मिळाली नाही, म्हणून ते आपल्या परिवारासोबत तडकाफडक थिएटरमधून बाहेर पडले होते. अभिजीत पानसेंचा हा अपमान मनसेच्या जिव्हारी लागला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिग्दर्शक अभिजीत पानसेंना पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारी ‘ठाकरे’ चित्रपटाचा प्रिमियर शो होता. या शो साठी प्रेक्षकांमध्ये बसण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे अभिजीत पानसे आपल्या परिवारासोबत तडकाफडकी थिएटरमधून बाहेर पडले होते. ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक असूनही त्यांना बसायला जागा मिळाली नाही, ही बाब मनसेच्या जिव्हारी लागली आहे. या घटनेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपला अभिजीत पानसेंना पूर्णपणे पाठिंबा असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. #ISupoortAbhijitPanse असा हॅशटॅग त्यांनी सुरु केला आहे. दरम्यान, मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनीही हा हॅशटॅग वापरुन अभिजीत पानसेंना पाठिंबा दर्शवला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बुधवारी रात्री ‘ठाकरे’ चित्रपटाचा प्रिमियर शो होता. या प्रिमियर शोसाठी थिएटरमध्ये वरिष्ठ मान्यवरांची उपस्थिती लावली होती. दरम्यान, ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना या चित्रपटाच्या प्रिमियरला यायला थोडा उशीर झाला. ते पोहोचले तेव्हा थिएटर हाऊसफूल झाले होते. बसण्यासाठी कुठेही जागा नाही, हे पाहून अभिजीत पानसे यांनी पाठ फिरवली आणि परिवारासोबत थिएटरमधून बाहेर निघून गेले. यादरम्यान चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी त्यांची समजूत घालण्याची प्रयत्न केले. परंतु, अभिजीत पानसे आपल्या परिवरासोबत थिएटरमधून निघून गेले. या घटनेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अभिजीत पानसे यांना पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, ‘कोणी अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लाथ कशी मारायची हे काही लोकांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे.’ त्यांनी #ISupoortAbhijitPanse हे हॅशटॅग सुरु केले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी निघाले

कोण आहेत अभिजीत पानसे?

दिग्दर्शक अभिजीत पानसे हे मनसे नेते देखील आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘रेगे’ चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. या चित्रपटावरुन प्रेक्षकांनी त्यांचे भरभरुन कौतुक केले होते. अभिजीत पानसे मनसेच्या अगोदर शिवसेनेमध्ये होते. ते विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते मनसेमध्ये आले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -