घरमुंबईबाळासाहेबांचा असाही एक शिवसैनिक!

बाळासाहेबांचा असाही एक शिवसैनिक!

Subscribe

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३ वी जयंती. त्यांच्या जयंती दिनानिमित्ताने गिरीश पाटील हे शिवसैनिक माहिम येथून शिवसेना भवन येथे सायकलवर आले आहेत. विशेष म्हणजे पाटील हे दिव्यांग आहेत.

काही कार्यकर्ते खरच फार विशेष असतात. त्यांच्या प्रती नेतेमंडळींच्या मनात एक वेगळा आदर असतो. त्यापैकीच हिंदूूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील एक शिवसैनिक म्हणजे गिरीश पाटील. गिरीश पाटील हे दिव्यांग आहेत. गेल्या २५ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी आपल्याच वाढदिवशी गिरीश पाटील यांना सायकल भेट म्हणून दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत पाटील शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवशी ते न चुकता हजर राहायचे. आज देखील ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना भवन येथे उपस्थित राहिले आहेत. ते माहिम येथून आले आहेत.

हेही वाचा – ‘त्या वेदनेच्या ठिणगीतून शिवसेना जन्मास आली’

- Advertisement -

‘ही सायकल म्हणजे बाळासाहेबांची आठवण’

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३ वी जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने हजारो शिवसैनिक शिवसेना भवन येथे उपस्थित राहतात. आज बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्ताने गिरीश पाटील हे शिवसैनिक देखील आपल्या सायकलवरुन शिवसेना भवन येथे उपस्थित राहिले आहेत. गिरीश पाटील हे दिव्यांग आहेत. २५ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी त्यांना सायकल दिली होती. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून ते माहिम येथून शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला ते न चुकता हजर राहायचे. याविषयी बोलताना गिरीश पाटील म्हणाले की, ‘ही सायकल म्हणजे बाळासाहेबांची आठवण आहे’. बाळासाहेब हिंदूजा हॉस्पिटलमध्ये बायपाससाठी अॅडमिट होते. तेव्हा पाटील यांनी बाळासाहेबांची रुग्णालयात सेवा केली होती. त्यावेळी ते चाफ्याचे फुले घेऊन जायचे. ‘मी त्यांच्या वाढदिवसाला गेलो की साहेब प्रत्येक वेळी मला माझी तब्येत विचारायचे’, असे गिरीश पाटील म्हणाले.


हेही वाचा – बाळासाहेबांमुळेच आज मी जिवंत – बिग बी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -