घरमुंबईभाजप नेत्यांच्या त्रासामुळेच वडिलांनी आत्महत्या केली, मोहन डेलकरांच्या मुलाचा खुलासा

भाजप नेत्यांच्या त्रासामुळेच वडिलांनी आत्महत्या केली, मोहन डेलकरांच्या मुलाचा खुलासा

Subscribe

जनतेची काम करत असल्यामुळे लोकप्रिय होते. परंतु भाजप नेत्यांना हे खटकत असल्यामुळे राजकीय षडयंत्र त्यांच्याविरोधात रचण्यात येत होते.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरिन्स लाईन येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी मरिन्स लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डेलकरांना न्याय मिळवून देऊ असे अश्वासन त्यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.

खासदार मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकरने मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे की, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडाभाई पटेल आणि भाजप नेत्यांनी दिलेल्या त्रासामुळेच वडिल मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. माझे वडिल दादरा नगर हवेलीतील नागरिकांच्या समस्या सोडवत होते. मागील दीड वर्षांपासून त्यांना त्रास दिला जात होता. वडिलांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावण्यात येत नव्हते. काही राजकीय कारणांमुळे प्रफुल खेडाभाई यांना मोहन डेलकरांच्या विरोधात राग होता यामुळे वडिलांच्या विरोधात कटकारस्थाने रचण्यात येत होती असा आरोप मोहन डेलकर यांच्या मुलाने भाजप नेत्यांवर केला आहे.

- Advertisement -

मोहन डेलकर नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनतेचे अनेक विषय संसदेत ते मांडत होते. जनतेची काम करत असल्यामुळे लोकप्रिय होते. परंतु भाजप नेत्यांना हे खटकत असल्यामुळे राजकीय षडयंत्र त्यांच्याविरोधात रचण्यात येत होते. डेलकरांना तुरुंगात टाकण्याचे भाजप नेत्यांचे कारस्थान असल्याचे मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर याने म्हटले आहे.

मतदार संघातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात वडिलांनी वाचा फोडली होती. यामुळे घरावर हल्ला करण्यात येत होते. लोकांची अशीच कामे करणे चालु ठेवली तर जनतेला तेवढाच अधिक त्रास होईल असे मोहन डेलकर यांना वाटत होते. यामुळे वडिल मोहन डेलकर यांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप अभिनव डेलकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अभिनव डेलकरने पुढे असे म्हटले आहे की, वडिलांनी भाजप शासित आत्महत्या केल्यास न्याय मिळणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रातूनच न्याय मिळेल असे वडिलांना वाटत असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली आहे. तशी सुसाईड नोट खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली आहे. या बाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आणि त्यांना त्रास देणाऱ्या भाजप नेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिले असल्याचे अभिनव डेलकर यांनी सांगितले आहे.

मरीन ड्राइव्ह येथील ग्रीन साउथ हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी डेलकर यांनी आत्महत्या केली. भाजप नेत्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. मोहन डेलकर यांनी १६ पानांचे सुसाइड नोट लिहिले आहे. तसेच मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -