घरदेश-विदेशWest Bengal Assembly Elections 2021 कंदहार विमान अपहरण, ममता ओलीस होण्यास तयार...

West Bengal Assembly Elections 2021 कंदहार विमान अपहरण, ममता ओलीस होण्यास तयार होत्या

Subscribe

कंदहार विमान अपहरण घटना जेव्हा घडली तेव्हा प्रवाशांच्या सुटकेसाठी ममता बॅनर्जी यांनी दहशतवाद्यांकडे स्वत:ला ओलीस ठेवण्याची तयारी दर्शवली होती. असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ माजी नेते य़शवंत सिन्हा यांनी केला आहे. सिन्हा यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटनांवरही प्रकाश टाकला.

यावेळी ते म्हणाले कि १९९९ साली दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी विमान अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले होते. याघटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. काय उपाययोजना करता येतील यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी प्रवाशांच्या सुटकेसाठी ओलीस म्हणून राहण्याची तयारी दर्शवली केली होती. पण त्यासाठी दहशतवाद्यांनी प्रवाशांना सोडावे अशी अट ममता यांची होती. ममता यांची ही भूमिका देशासाठी बलिदानाचीच भूमिका होती.

- Advertisement -

२४ डिसेंबर १९९९ साली दहशतवाद्यांनी काठमांडू येथून दिल्लीकडे जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमानाचे अपहरण केले होते. अमृतसर, लाहोर, दुबई असा प्रवास करत दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर विमान उतरवले. पण प्रवाशांच्या सुटकेसाठी काही दहशतवाद्यांना सोडण्याची अट दहशतवाद्यांनी सरकारपुढे ठेवली होती.
दरम्यान, सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताच मोदी सरकारला लक्ष्य केलं. देशाचे मूल्य संकटात असून त्यांच पालनही होत नसल्याचे त्यांनी म्हटले.लोकशाहीची शक्ती संस्थामध्ये असते पम आज त्या दुर्बल झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी देशाच्या न्यायव्यवस्थेवरही सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था राहीली नाही असेही सिन्हा यावेळी म्हणाले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -