घरमुंबईकल्याण-डोंबिवली महापालिकेत महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; आरोपी विरोधात तक्रार दाखल

कल्याण-डोंबिवली महापालिकेत महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; आरोपी विरोधात तक्रार दाखल

Subscribe

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकाच्या कॅबिनमध्ये शिरून महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी आवाज उठवल्याने केडीएमसीतील भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला केबिनमध्ये शिरून अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत धमकवल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी महापालिकेत घडला. विशेष म्हणजे भाजपच्या दोन नगरसेवकांसमोरच हा प्रकार घडला. याप्रकरणी महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून उमेश साळूंखे नामक इसमाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कुणाचीच भिती उरली नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट हेाते.

अनधिकृत बांधकामाची नगरसेविकेने केली तक्रार

कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. मांडा पूर्व प्रभागातील भव्य संकुल हौ. सोसायटीत राहणाऱ्या लोकांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर व सोसायटीच्या सांडपाण्याचा निचरा होतो त्याच ठिकाणी उमेश साळूंखे यांनी ऑफिस आणि खोल्यांचे अनधिकृत बांधकाम केले आहे. या विरोधात सोसायटीतील रहिवाश्यांनी उपोषण केले होते. तसेच महिला पदाधिकाऱ्याने देखील महापालिकेत तक्रार केली हेाती. मात्र महापालिकेने अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या अनधिकृत बांधकामासंदर्भात त्या महिला नगरसेविकेने गुरूवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली होती. त्यामुळे साळुंखे हे संतप्त झाले होते.

- Advertisement -

महिला पदाधिकाऱ्याचा पती, नगरसेवकांपुढेच घडला प्रकार

त्यांनी महापालिकेतील त्या महिला पदाधिकाऱ्याच्या केबीनमध्ये शिरून लक्षवेधी मांडल्याबद्दल जाब विचारला. महिला पदाधिकाऱ्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून धमकावले. सुरक्षा रक्षकाला सांगून साळूंखे यांना केबीनच्या बाहेर काढण्यास सांगितले असता त्यांनी सुरक्षा रक्षकालाही शिवीगाळ करून धमकी दिली. या वेळी सदर ठिकाणी त्या महिला पदाधिकाऱ्याचे पती व भाजपचे दोन नगरसेवक उपस्थित होते. याप्रकरणी महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून साळूंखे विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -