घरमुंबईमुकेश अंबानींची काँग्रेसला साथ

मुकेश अंबानींची काँग्रेसला साथ

Subscribe

मुकेश अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहे, अशी सर्रास चर्चा सगळीकडे सुरु असते. मात्र, मुकेश अंबानी यांनी भाजपला आणि त्यांच्या युतीला साथ न देता काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचे समर्थन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांचे प्रचार सुरु आहेत. सध्या डिजिटल प्रचाराची नवी पंरपरा सुरु झाली आहे. सोशल मीडिया साईट्सवर देशातील सर्वाधिक नागरिक असल्यामुळे आता लोकसभेचे उमेदवार आपला प्रचार सोशल मीडियावर करत आहेत. दरम्यान, या प्रचारासंबंधीचा एक व्हिडिओ दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी मिलिंद देवरा यांचे समर्थन करत असल्याचे दिसत आहेत. ‘मिलिंद म्हणजे दक्षिण मुंबईचा विकास पुरुषोत्तम’, अशा शब्दात अंबानी यांनी मिलिंद यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अंबानी आणि मोदी यांचे चांगले संबंध असूनही अंबानी काँग्रेसला समर्थन कसे देत आहेत? अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. ‘टाईम्स’ या मॅगझीनने नुकतेच जगातील १०० प्रभावी व्यक्तीमत्वाचे नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये अंबानी यांचे देखील नाव आहे. त्यामुळे अंबानी यांनी काँग्रसचे समर्थन केले तर थोडाफार परिणाम मतांवर होऊ शकतो. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरांना टक्कर देण्यासाठी अरविंद सावंत शिवसेनेकडून उमेदवारी लढवत आहेत.

नेमकं काय म्हणाले अंबानी?

मुकेश अंबानी व्हिडिओमध्ये म्हणाले की, ‘गेल्या दहा वर्षांपासून मिलिंद दक्षिण मुंबईमध्ये काम करत आहेत. त्यांचे सखोल ज्ञान, सामाजिक जाणिव आणि संस्कृती असलेल्या नात्यावर आमचा विश्वास आहे.’ त्या व्हिडिओमध्ये अंबानींसोबत आणखी काही उद्योजक बोलत आहेत. ते उद्योजक देखील मिलिंद देवरा यांचे समर्थन करत आहेत. हुशार तरुण विद्यार्थ्यासांठी नोकरी मिळवून देणे महत्त्वाचे असल्याचेही या उद्योजकांनी म्हटले आहे. मिलिंद देवरा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सोबत त्यांनी म्हटले आहे की, ‘दक्षिण मुंबई म्हणजे व्यावसाय. छोट्या-मोठ्या दुकाणांपासून ते मोठ-मोठ्या कंपनी दक्षिण मुंबईत आहेत. आपले उद्योगधंदे आणखी वाढावे आणि देशातील हुशार तरुणांना नोकरीची संधी मिळणे फार गरजेचे आहे.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -