घरमुंबईधारावी नाही तर मुंबईतील 'हे' भाग कोरोनाचा ठरतायत हॉटस्पॉट!

धारावी नाही तर मुंबईतील ‘हे’ भाग कोरोनाचा ठरतायत हॉटस्पॉट!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण अधिक वेगात वाढत आहेत.

देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळले आहे. मुंबई शहरातील धारावी हा आतापर्यंत कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण अधिक वेगात वाढत आहेत. मुंबई उपनगरातील अंधेरी आणि दहिसर हे प्रभाग धारावी नंतर आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहेत.

अंधेरी पूर्व भागात कोरोना रुग्णांच्या संख्येने ४ हजारांचा टप्पा पार केला आहे. आता या परिसरात ४ हजार ७६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईतील कोरोनाचे सुरुवातीला हॉटस्पॉट असलेल्या धारावी, वरळी, कुर्ला, भायखळा या प्रभागातही अजून ४ हजार रुग्ण संख्या नव्हती ती संख्या अंधेरी पुर्व भागात झपाट्याने वाढत असताना दिसतेय.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी धारावी भागात नवे २१ कोरोना रूग्ण, दादर भागात ३४ रूग्ण, माहिममध्ये २० असे नवे रूग्ण आढळून आले आहेत. यावरून आता धारावीमध्ये २ हजार ८९ अशी सध्या कोरोना रूग्णांची आकडेवारी आहे. तर मुंबईत जवळपास दोन आठवड्यांपूर्वी जी उत्तर वॉर्ड म्हणजे धारावी, माहीम, दादर या परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. तर आर उत्तर वॉर्ड म्हणजे दहिसरमध्ये कोरोना संक्रमणाचे सर्वात कमी होते. ते आता बदलून या प्रभागात १३ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहेत.

तसेच, नव्या रुग्णवाढीचा दर ५.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दादर, भायखळा या ठिकाणी आता ४० दिवसांनी रुग्ण दुप्पट होत असल्याचे सांगण्यात येत आहे.


वर्षा उसगावकर यांचे वडिल गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -