घरमुंबई'स्मारकांसाठी हजारो कोटी, पण पुलासाठी पैसे नाहीत'

‘स्मारकांसाठी हजारो कोटी, पण पुलासाठी पैसे नाहीत’

Subscribe

'बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील. सराकरने याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी', असे वारिस पठाण म्हणाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारत अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पूलाचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर सर्वच पक्षाचे नेते घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवरव टीका केली आहे. ‘स्मारकासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत. लोकांच्या सुरक्षेचे काय?’, असा प्रश्न वारिस पठाण यांनी विचारला आहे.

नेमकं काय म्हणाले वारिस पठाण?

वारिस पठाण म्हणाले की, ‘बऱ्याचदा सांगूनही या पूलाचे ऑडीट झालेलं नाही. हजारो लोक इथून दररोज प्रवास करतात. आता या पुलावरुन एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार होईल. बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील. सराकरने याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. सरकारकडे स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये आहेत, पण पूल बनवण्यासाठी नाहीत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -