घरमुंबईबुलेट ट्रेनची स्वप्न दाखवणाऱ्यांनी आधी पुलाचे ऑडिट करावे - धनंजय मुंडे

बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवणाऱ्यांनी आधी पुलाचे ऑडिट करावे – धनंजय मुंडे

Subscribe

“एल्फिन्स्टनची दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सर्व पूलांचे ऑडिट का केले गेले नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी. पूलाचे ऑडिट झाले असते तर आज लोकांचा नाहक बळी गेला नसता.”, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आपल्या ट्विटरवर त्यांनी ट्विट करून सरकारला जाब विचारला आहे. ते म्हणाले की, “मुंबईत पुन्हा पादचारी पूल कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वारंवार मागणी केली होती. सरकार मात्र ढिम्म बसले.”

- Advertisement -

सविस्तर बातमी – CSMT स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळला, पाच जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -