घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत गुरुवारी १ हजार ५०८ नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत गुरुवारी १ हजार ५०८ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

तर मुंबईत आज ९११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्णांनी पंधरा हजारांचा टप्पा पार केला आहे. आज मुंबईत १ हजार ५०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत आज ९११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ६३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ लाख १४ हजार २५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९३ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ११ हजार ९६९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -

मुंबईत ४ मार्च ते १० मार्चपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर हा ०.३४ टक्के इतका आहे. १० मार्चपर्यंत मुंबईत एकूण ३४ लाख ९६ हजार १४५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत २७ कटेंनमेंट झोन आहेत. तर २२८ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अशाचप्रकारे वाढत राहिली तर मुंबईतही लॉकडाऊन घोषित करावा लागले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत कोरोना लस घेतली. मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी कोरोना चाचणी करण्यास नकार देऊ नका, कोरोना चाचणी करुन घ्या, हात धुणे, मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे हे जनतेच्या हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Lockdown: नाईलाजाने काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -