घरमुंबईMumbai Corona Update: मुंबईत ३ हजार ५१२ कोरोना रुग्णांची नोंद, ८ मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत ३ हजार ५१२ कोरोना रुग्णांची नोंद, ८ मृत्यू

Subscribe

आतापर्यंत एकूण ११,६०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोना प्रादुर्भाव वाढला असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत मागील २४ तासात ३ हजार ५१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज ३ हजारांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद असल्यामुळे मुंबईतील स्थिती चिंताजनक झाली आहे. मागील २४ तासात १२०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६९ हजार ४२३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ३,२९,२३४ रुगणांनी कोरोना मात केली आहे.

मुंबईत आज गेल्या २४ तासात ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण ११,६०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९०% आहे. तर कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा ९० दिवसांचा आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने मुंबईत ३८ कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. तसेच ३६३ इमारतींना सील करण्यात आले आहेत.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -