घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: मी ३-४ तास रस्त्यावर पडलो होतो ! कीवमधील गोळीबारात जखमी...

Russia-Ukraine War: मी ३-४ तास रस्त्यावर पडलो होतो ! कीवमधील गोळीबारात जखमी भारतीय विद्यार्थ्यांने सांगितला थरार, पाहा व्हिडीओ

Subscribe

मी बेशुद्ध होतो. डोळे उघडल्यावर केवळ अंधुक प्रकाश आणि थंड हवा जाणवायची. अपघात झाला तेव्हा -२ तापमान होते, असे मला डॉक्टरांनी सांगितले. खूप रक्तस्त्राव झाला होता. २ मार्चला रात्री १० वाजता मला पूर्णपणे शुद्ध आली. तेव्हा डॉक्टरांनी मला संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

कीवमधून मायदेशी परतत असलेला एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला. हरज्योत सिंह असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून गाडीतून प्रवास करत असताना त्याला गोळी लागली. कीव येथून पोलंड सिमेकडे जाताना हा प्रकार घडला. गोळी लागल्यानंतर विद्यार्थ्यांला पुन्हा कीव येथे नेण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ए के ४७मधून त्याच्यावर गोळीबार झाल्याचे विद्यार्थ्यांने म्हटले आहे. त्याने संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम देखील सांगितला असून विद्यार्थ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हरज्योत सिंहने सांगितले,  २७ फेब्रुवारी रोजी माझ्यासोबत ही घटना घडली. जिथून सगळ्या शहरात जाण्यासाठी ट्रेन निघतात तिथे मी कीवहून निघालो होतो. मी ३-४ वेळा ट्रेनने जाण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही त्यानंतर आम्ही प्रायव्हेट कारने जाण्याचे ठरवले. आम्ही तिघांनी १ डॉलरला कॅब फायनल केली. आम्ही तीन चेक पॉइंट क्रॉस केले. तिसऱ्या पॉइंटवरुन आम्हाला माघारी फिरण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही मागे फिरलो. आणि किवमध्ये येताच आमच्यावर हल्ला झाला.

- Advertisement -

कीव शहरात माझ्यावर हल्ला झाला. माझ्या डोळ्यांसमोर गोळी आली. गोळीबार सुरू झाल्यानंतर आम्ही गाडीत खाली बसलो. खाली बसल्यानंतर बिल्डिंगमधून आणि बिल्डिंगच्या खालून चार पाच लोक सातत्याने आमच्यावर फायरिंग करत होते. त्यांच्याकडे ए.के.४७ होती. आम्ही गाडीचे दरवाजे उघडून फुटपाथच्या दिशेने पळ काढला. मी स्वत:ला वाचवण्यासाठी माझे दोन्ही हात छातीवर ठेवून जमिनीवर झोपलो. त्यानंतर माझ्या डाव्या गुडघ्याला एक बुलेट ( गोळी ) लागली. एक गोळी माझ्या बाजूने गेली आणि तिसरी गोळी माझ्या हाताला लागून छातीत लागली. त्यानंतर मी बेशुद्ध झालो.

- Advertisement -

मी बेशुद्ध होतो. डोळे उघडल्यावर केवळ अंधुक प्रकाश आणि थंड हवा जाणवायची. अपघात झाला तेव्हा -२ तापमान होते, असे मला डॉक्टरांनी सांगितले. खूप रक्तस्त्राव झाला होता. २ मार्चला रात्री १० वाजता मला पूर्णपणे शुद्ध आली. तेव्हा डॉक्टरांनी मला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ३-४ तास मी रस्त्यावर पडलो होतो. छातीत लागलेली गोळी आम्ही काढली आहे आणि प्लास्टर केल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले.

भारतातील दिल्लीत मी राहतो. शुद्धीवर आल्यानंतर मी पहिल्यांदा आईला फोन केला. संपूर्ण कुटुंबाशी माझे बोलणे झाले. मला नवीन आयुष्य मिळाले. मी माझे नवे आयुष्य माझ्या कुटुंबासोबत घालवू इच्छितो.

अपघात झाल्यानंतर भारतीय दूतावासाकडून आम्हाला अद्याप कोणतेही समर्थन मिळालेले नाही. मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ते दररोज म्हणतात आपण काही तरी करु मात्र अजूनही काहीच मदत मिळालेली नाही. युक्रेन युद्धभूमीवर अनेक भारतीय विद्यार्थ्यांना गोळ्या लागल्या आहेत आणि त्यांच्यावरही कीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे हरजोत सिंगने सांगितले आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात अमेरिकेचा मोठा दावा, भारताने रशियासोबतचा लष्करी करार केला रद्द?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -