घरताज्या घडामोडीMumbai Corona Update : दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं आली खाली, एकाचा...

Mumbai Corona Update : दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं आली खाली, एकाचा मृत्यू

Subscribe

मुंबईत सध्या 1 हजार 415 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे कारण गेल्या २४ तासात कोरोना चाचण्यांमध्ये घट झाली आहे. दर दिवसाला 30 हजारपेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात सोमवारी केवळ 16 हजार ४७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं खाली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर मुंबईतील दिवसाला नोंद होणारी कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 96 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात 1 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 16 हजार 688 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं ज्या उपाययोजना राबवल्या त्याचा फायदा झाला असल्याचे दिसत आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर गेल्या महिन्याभरापासून स्थिर राहिला आहे. तर आता कोरोना रुग्णांची दुप्पट होण्याचा दर 3313 दिवसांवर गेला आहे. ही मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे मुंबईत गेल्या २४ तासात 96 कोरोना रुग्ण सापडले आहेत यामधील केवळ 17 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 4 रुग्ण हे अतीजोखमीचे असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. मुंबईत सध्या 1 हजार 415 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे कारण गेल्या २४ तासात कोरोना चाचण्यांमध्ये घट झाली आहे. दर दिवसाला 30 हजारपेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात सोमवारी केवळ 16 हजार ४७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -


मुंबईत सध्या दीड हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. यातील 403 रुग्ण ऑक्सीजन बेडवर उपचार घेत आहेत. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 055 हजार 657 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून आता मुंबईत एकाही इमारतीला सील करण्यात आले नाही. तसेच मुंबईत हळूहळू निर्बंध शिथील करण्यात येत आहेत.


हेही वाचा : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी महापौरांनी पाठवलेल्या पत्राची महिला आयोगाकडून दखल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -