घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत आज 1815 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 11...

Mumbai Corona Update: मुंबईत आज 1815 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 11 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आजही शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 34 सक्रीय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईत आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी 12 हजारांचा आकडा गाठणारा रुग्णसंख्या आता 1800 वर पोहचली आहे. यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1815 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय आज 753 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज वाढले आहे. मुंबईत आज रुग्ण दुप्पट होण्याचा दर 161 दिवस झाला आहे.

मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या नव्या रुग्णांपैकी 293 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 68 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. दरम्यान आज नोंदवलेल्या 1525 रुग्णांना कोणताही लक्षणे नाहीत. तर 37 हजार 874 बेड्सपैकी केवळ 3,474 बेड्स आता भरलेले आहेत. मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 96 टक्के इतका झाला आहे.

- Advertisement -


मुंबईत आजही शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 34 सक्रीय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आज एकूण 34 हजार 427 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 150,45,946 इतकी झाली आहे. मुंबईत आत्तापर्यंत 1,038,505 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 97 हजार 042 इतकी झाली आहे. याशिवाय 16 हजार 556 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जानेवारी ते 24 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील एक कोरोना वाढीचा दर हा 0.42 टक्के झाला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -