घरक्राइमMumbai Crime : मुंबईत तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोन नराधमांना अटक

Mumbai Crime : मुंबईत तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोन नराधमांना अटक

Subscribe

मुंबईत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : महिला, मुलींसाठी मुंबई असुरक्षित असल्याची घटना पुन्हा एकदा मुंबईत घडली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी दोन जणांना अटकसुद्धा केली आहे. (Mumbai Crime  Gang rape of young woman in Mumbai Two murderers arrested)

मुंबईत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या एका सरकारी फ्लॅटमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी भादंवि कलम 376, 376 (डी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : 1 हजारच्या बदल्यात 1300 रुपये दिले; त्यानंतर महिलेला बसला धक्का, बँक खात्यातून स्कॅमरने 36 लाख उडवले

ओळखीतील व्यक्तीनेच केला अत्याचार

महाविद्यालयीन तरुणीवर झालेली अत्याचाराची घटना ही 15 ते 16 नोव्हेंबरच्या रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेतील एक आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखतात आणि त्यांचे वडीलही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. घटनेच्या रात्री आरोपीचे कुटुंबीय घराबाहेर गेले होते. यावर आरोपीने त्याच्या आणखी एका मित्रालाही घरी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी हा प्रकार केला.

- Advertisement -

हेही वाचा : IND VS AUS : अंतिम सामन्यांवर सट्टेबाजी कराल तर सावधान; पोलिसांची आहे करडी नजर

पीडितेला दारू पाजून केला बलात्कार

पीडित तरूणी तेथे स्वयंपाकाचे काही साहित्य घेण्यासाठी आली होती. यावर दोन्ही आरोपींनी पीडितेला दारू पाजली. ड्रिंक प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली, त्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने तिच्या जवळच्या मित्रांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -