घरICC WC 2023IND VS AUS : अंतिम सामन्यांवर सट्टेबाजी कराल तर सावधान; पोलिसांची आहे...

IND VS AUS : अंतिम सामन्यांवर सट्टेबाजी कराल तर सावधान; पोलिसांची आहे करडी नजर

Subscribe

विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू झाला असून, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघा दरम्यान ही लढत होत आहे.

मुंबई : विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला असून, भारत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. एकीकडे देशभर क्रिकेट फिवर चढलेला असताना दुसरीकडे मात्र, सट्टेबाजही एक्टीव्ह झालेले आहेत. या अंतिम सामन्यांच्या बॉल टू बॉलवर सट्टा लावून कोट्यवधीची उलाढाल होणार असल्याची माहिती असतानाच पोलीसही मात्र त्याच गतीने अलर्ट झाले आहे. मुंबई, पुण्यासह देशभरातील विविध महानगरातून सट्टाबहाद्दरांवर पोलिसांची करडी नजर असून, काही ठिकाणी कारवाईलासुद्धा सुरुवात झाली आहे. (IND VS AUS  BEWARE IF BETTING ON FINAL MATCHES The police have a gray eye)

विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू झाला असून, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघा दरम्यान ही लढत होत आहे. दोन्ही संघ क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघ असल्याने विश्वचषकावर कोणता संघ नाव कोरतो हे पहावे लागणार आहे. अशातच देशभरातील सट्टेबाजही या सामन्याच्या प्रत्येक बॉलवर सट्टा लावत असल्याने या सट्टाबाजाराची लाइन देशभर विणल्या गेली असून, सर्वसाधारणपणे मुंबई हे त्याचे मुख्यालय समजल्या जात असून, येथे आलेला सट्टा दुबईला जात असल्याचा अंदाज पोलिसांचा असल्याने या सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, पोलिसांनीही आता शोध मोहिम सुरू केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ICC WC 2023 : IND-AUSमध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी होणार महामुकाबला

ही आहे सट्टा चालवली जाणारी शहरं

सध्या तर संपूर्ण देशात कुठे ना कुठे क्रिकेट खेळावर सट्टा लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. असे जरी असले तरी देशातील मुख्यता सूरत, अहमदाबाद, कच्छ, जयपूर, शिमोगा, कोलकाता, बंगळुरू, इंदुर, मुंबईमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात चालत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही सट्टा चालविल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अंजली दमानियांच्या आरोपांवर समीर भुजबळांचा खुलासा, म्हणाले – “हा त्यांचा मीडिया स्टंट”

नागपूर टू मुंबई आणित थेट दुबई

सट्टा चालवणाऱ्यांची एक ‘लाइन’ (टोळी) असून, ही लाइन सर्वसाधारणपणे नागपूरपासून सुरू होत असून, ते विविध शहरामधून सट्टा घेऊन मुंबईमध्ये पोहचते. हा सगळा व्यवहार ऑनलाइन स्वरुपाचा परंतू तेवढाच गुप्तपणे चालवल्या जातो. देशातील विविध महानगराप्रमाणेच इतरही लहान मोठ्या शहरात लहान मोठे सट्टेबाज आपली दुकाने थाटून बसलेले असतात. जिंकणाऱ्या टीमपेक्षा हरणाऱ्या टीमवर सर्वाधिक सट्टा खालल्या जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -