घरक्राइमMumbai Crime News : गुंतवणुकीच्या नावाने दीड कोटींची फसवणूक; हॉटेल व्यावसयिकाविरुद्ध गुन्हा...

Mumbai Crime News : गुंतवणुकीच्या नावाने दीड कोटींची फसवणूक; हॉटेल व्यावसयिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

Mumbai Crime News : गुंतवणुकीच्या नावाखाली सोळा जणांची तब्बल एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सलमान याकूब घडिया या हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली सोळा जणांची तब्बल एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सलमान याकूब घडिया या हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सलमान पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Mumbai Crime News fraud of Rs 1 crore 60 lakh in the name of investment; a case has been registered against the hotelier)

तक्रारदारांपैकी एक जण माहीम येथील असून कूपर रुग्णालयात कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची सलमानशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने जोगेश्‍वरी येथे एक हॉटेल चालविण्यासाठी घेतल्याचे सांगितले. या व्यवसायासाठी आपल्याकडे गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीवर तो त्यांना चांगले व्याजदर देईल असे आश्वासन सलमानने दिले होते. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने त्याच्याकडे वीस लाखांची गुंतवणूक केली.

- Advertisement -

सुरुवातीचे काही महिने त्याने नियमितरित्या त्यांना व्याजदराची रक्कम मिळाली. नंतर मात्र ही रक्कम मिळणे बंद झाले. याच दरम्यान सलमानने तक्रारदाराला चार लाख रुपये परत केले. मात्र व्याजदराची रक्कम देणे बंद केल्यानंतर सलमानकडे उर्वरित पैशांची मागणी तक्रारदाराने केली. मात्र त्याने पैसे परत केले नाही. चौकशीदरम्यान त्यांना सलमानने त्यांच्यासह इतर पंधराजणांकडून अशाच प्रकारे पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजले. या सर्वांकडून त्याने एक कोटी साठ लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही पैसे परत न करता तो हॉटेल बंद करुन पळून गेला. हा प्रकार लक्षात येताच या सर्वांनी ओशिवरा पोलिसांत सलमानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Crime News fraud of Rs 1 crore 60 lakh in the name of investment; a case has been registered against the hotelier)

सलमानने अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सलमानकडून फसवणूक झालेल्या लोकांनी ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
———————————————

- Advertisement -

Crime News : फ्लॅट भाड्याने देते, असे सांगत वृद्धाची फसवणूक; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : माहीम परिसरात भाड्याने फ्लॅट देते असे सांगून एका वृद्धाकडून डिपॉझिट म्हणून घेतलेल्या 34 लाखांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरियम सय्यद या महिलेविरुद्ध माहीम पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यातील तक्रारदार संगीतकार असून ते माहीम परिसरात राहतात. (Mumbai Crime News fraud of an old man by saying that she rents a flat; a case has been registered against the woman aab)

तक्रारदारांचे घर मोडकळीस आले होते, त्यामुळे ते भाड्याने राहण्यासाठी दुसर्‍या फ्लॅटचा शोध घेत होते. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या परिचित मरियमने माहीम येथे एक फ्लॅट देते, असे सांगितले. काही दिवसांनी तिने सायरा दिदी या महिलेचा एक फ्लॅट त्यांना दाखविला. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांना तो फ्लॅट आवडला आणि त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. हेव्ही डिपॉझिट म्ह्णून त्यांनी तिला 34 लाख रुपये दिले. मात्र जानेवारी महिन्यांत फ्लॅटचा ताबा देते असे सांगून मरियमने मार्च महिना उलटूनही त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. कॉल केल्यानंतर ती त्यांना प्रतिसाद देत नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सायरा दिदींशी भेट घेतली होती. यावेळी तिने फ्लॅटची चावी मरियम हिला देणार असल्याचे सांगितले. मात्र मरियमकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माहीम पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मरियम सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -