घररायगडLok Sabha 2024 : तटकरेंनी विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी, नाहीतर...; भरत गोगावलेंचा...

Lok Sabha 2024 : तटकरेंनी विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी, नाहीतर…; भरत गोगावलेंचा इशारा

Subscribe

सुनील तटकरेंच्या खासदारकीची आम्ही गॅरंटी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेला त्यांनी आमची गॅरंटी घ्यावी, नाहीतर त्यांना आम्ही दाखवून देऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे.

मुंबई : अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या (19 एप्रिल) मतदान होत आहे. पण अद्यापही राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. महायुतीने अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि स्थानिक नेते भरत गोगावले यांनी इशारा दिला आहे. सुनील तटकरेंच्या खासदारकीची आम्ही गॅरंटी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेला त्यांनी आमची गॅरंटी घ्यावी, नाहीतर त्यांना आम्ही दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics Sunil Tatkare to take our guarantee to the Legislative Assembly Bharat Gogawle warns)

रायगड मतदारसंघात 20 मे रोजी म्हणजेच शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र त्याआधीच रायगडमध्ये वेगळंच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडची जागा शिवसेना शिंदे गटाला हवी होती. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेल्यामुळे शिंदे गट नाराज होता. असे असले तरी पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना इच्छा नसतानाही सुनील तटकरेंना जिंकवून देण्यासाठी मदत करावी लागणार आहे. मात्र स्थानिक नेते भरत गोगावले यांच्या मनातील खदखद बाहेर पडताना दिसत आहे. सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सातत्याने केले! शिंदे गटाचा आरोप

भरत गोगावले म्हणाले की, सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी आम्ही घेतली आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी लागेल. जर त्यांनी विधानसभेला आमची गॅरंटी घेतली नाही तर आम्ही त्यांना दाखवून देऊ, शेवटी आम्ही देखील रायगडचे मावळे आहोत, अशा शब्दात भरत गोगावले यांनी इशारा दिला आहे. याचवेळी पालकमंत्री पदाविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मी आज ना उद्या रायगडचा पालकमंत्री होणार आहे. त्यामुळे  उगाच जुन्या खपल्या कशाला काढताय? मी झालं गेलं विसरून गेलो आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात, असे म्हणत त्यांनी जास्त बोलणे टाळले.

- Advertisement -

नाशिकचा दावा सोडणार नाही

नाशिकच्या जागेबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, नाशिक लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार, यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र नाशिक लोकसभेचा दावा आम्ही अद्याप सोडलेला नाही. आज उद्यापर्यंत नाशिक लोकसभेचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अब की बार 400 पार हा भाजपाचा प्रपोगेंडा; वर्षा गायकवाड यांची टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -