घरमुंबईमुंबईकरांच्या मदतीला धावली एसटी

मुंबईकरांच्या मदतीला धावली एसटी

Subscribe

बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपामुळे आज अनेक मुंबईकर वेळेत ऑफिसला पोहचू शकले नाही. तर शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील या संपाचा फटका बसला असून त्यांना वेळत जाता आले नाही.

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहे. या संपाचा परिणाम मुंबईकरांवर होत आहे. आज सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावली नाही. या संपामुळे मुंबईकरांची गैरसोय होत असून बस नसल्यामुळे पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत आहे. मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या मदतीला एटसी धावून आली आहे. मुंबईकरांसाठी ४० एसटी बस रस्त्यावर उतरल्या असून अनेक बेस्टचे प्रवासी त्याचा वापर करत आहेत. जर गरज पडली तर आणखी एसटी गाड्या सोडल्या जातील अशी माहीती एसटी प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

यामार्गावर एसटी सेवा सुरु

कुर्ला पश्चिम ते बांद्रा मार्गावर ५ एसटी सेवा सुरु आहे. कुर्ला पूर्व ते चेंबूर या मार्गावर ५ एसटी सेवा सुरु आहे. दादर ते मंत्रालय या मार्गावर ५ एसटी सेवा सुरु आहे. पनवेल ते मंत्रालय या मार्गावर ५ एसटी सेवा सुरु आहे. सीएसएमटी स्टेशन ते मंत्रालय या मार्गावर ५ एससटी तर ठाणे ते मंत्रालय या मार्गावर १५ एसटी सेवा सुरु असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

संपामुळे वेळत पोहचले नाही

बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपामुळे आज अनेक मुंबईकर वेळेत ऑफिसला पोहचू शकले नाही. तर शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील या संपाचा फटका बसला असून त्यांना वेळत जाता आले नाही. दरम्यान, या संपाचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना होत आहे. या संपामुळे बऱ्याच ठिकाणी प्रवाशांची लूट सुरु असून रिक्षा आणि टॅक्सी चालक अव्वाच्या सव्वा भाडे उकाळत आहेत.

- Advertisement -

काय आहेत मागण्या ?

१) बेस्ट उपक्रमाच्या क अर्थसंकल्प मनपाच्या अ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी.

२) २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७३९० रुपये सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चित केली जावी.

३) एप्रिल २०१६ पासून लागू करायच्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात.

४ ) बेस्टमधील ४,९०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी द्यावी.

५) दिवाळीपूर्वी जाहीर केलेले ५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे.

६) कर्मचारी सेवा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढावा.

७) अनुकंपा भरती सुरू करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -