घरCORONA UPDATEमुंबईत दारूची दुकानं उघडण्यासाठी काय आहेत नियम? वाचा सविस्तर!

मुंबईत दारूची दुकानं उघडण्यासाठी काय आहेत नियम? वाचा सविस्तर!

Subscribe

देशभरासह राज्यात विविध ठिकाणी कंटेनमेंट झोन वगळता ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी तर पोलिसांना गर्दी कमी करण्यासाठी लाठीमार देखील करावा लागला. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरांत नक्की काय परिस्थिती आहे, यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. मात्र, कंटेनमेंट झोन वगळता मुंबई उपनगरांत इतर ठिकाणी कशा प्रकारे आणि कोणत्या अटींवर दारूची दुकानं दुकानं सुरू ठेवता येणार आहेत, याची एक नियमावलीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केली आहे. काय आहे या नियमावलीमध्ये?

दारूच्या होलसेल विक्रेत्यांसाठी…

१) कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात दारूची विक्री सुरू करण्यात येईल. मात्र, संध्याकाळी ५ वाजेनंतर विक्री बंद करावी लागेल.

- Advertisement -

२) केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार कामाच्या ठिकाणचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.

३) कामगारांची थर्मल स्कॅनिंग करून ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं आहेत, त्यांना तिथे प्रवेश देऊ नये.

- Advertisement -

४) विक्रेत्यांनी ५० टक्के कर्मचारी वर्गावर काम करावे

दारूच्या रिटेल विक्रेत्यांसाठी…

१) फक्त सीलबंद दारू विक्रीस परवानगी असेल. मॉलव्यतिरिक्त इतर ठिकाणची दुकानं सुरू ठेवता येतील.

२) दुकानासमोर ५ पेक्षा जास्त ग्राहक एका वेळी असता कामा नयेत. दोन ग्राहकांमध्ये ६ फूट अंतर असावे. दुकानासमोर त्या अंतरावर वर्तुळं आखली जावीत.

३) कामगारांची थर्मल स्कॅनिंग करून ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं आहेत, त्यांना तिथे प्रवेश देऊ नये.

४) दुकान आणि दुकानाभोवतीचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावा लागेल. ग्राहकांना हँड रब सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावा लागेल.

५) ही दुकानं सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली राहतील.

६) मद्य बाळगणे किंवा खरेदी करणे याबाबतच्या इतर कायद्यांचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतली जावी.

७) दारूच्या दुकानांच्या ठिकाणीच दारू सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कठोर कारवाई होईल.

८) दुकानाच्या बाहेर सहज दिसेल असा बोर्ड लावावा लागेल, त्यावर पुढील बाबींचा ठळक उल्लेख असावा
– दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा
– एका वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत
– सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य
– ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग होईल. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांनी दुकानात प्रवेश करू नये
– दुकानात मद्यप्राशनास मनाई
– परिसरात थुंकण्यास मनाई
– दुकानदार किंवा ग्राहकाने नियमभंग केल्यास कठोर कारवाई होईल

९) कोणत्याही परिस्थितीत एमआरपीचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

mumbai letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -