घरताज्या घडामोडीCoronaVirus: अमेरिकेनं केली चीनची पोलखोल, कोरोनाबाबत लपवली होती माहिती

CoronaVirus: अमेरिकेनं केली चीनची पोलखोल, कोरोनाबाबत लपवली होती माहिती

Subscribe

चीननं कोरोना विषाणू संदर्भात माहिती का लपवली? याचा अमेरिकेने खुलासा केला आहे.

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या आकडा ११ लाखांहून अधिक झाला असून मृतांचा आकडा ६८ हजार पार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर अनेक आरोप करताना दिसत आहे. पुन्हा अमेरिकेनं चीनवर निशाणा साधला  असून चीननं कोरोना विषाणू संदर्भातली माहिती का लपवली? याचा अमेरिकेने खुलासा केला आहे.

चीननं जगभरात कोरोना विषाणूचं किती मोठ्या प्रमाणात संक्रमण झालं हे पाहण्याकरिता कोरोनासंदर्भातील माहिती लपवून ठेवली. जेणेकरून इतर देशांना निर्यात करत असलेला वैद्यकीय पुरवठा वाढूव शकेल, असं अमेरिकेच्या गुप्तचर दस्तऐवजांमधून दिसून आलं आहे. मे महिन्याच्या होमलँड इंटलिजन्स सिक्युरिटी विभागाच्या अहवालानुसार, चीनच्या नेत्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला जगभरात पसरलेल्या या विषाणू प्रादुर्भावाची तीव्रता जाणूनबुजून लपविली, अशी टीका केली. पदेशातील वैद्यकीय पुरवठा वाढवण्यासाठी चीननं कोरोना संक्रमण झालं आहे हे जागतिक आरोग्य संघटनेलाही सांगितलं नव्हतं. पीपीई किट, मास्क, हँडग्लोज यांची आयात चीननं मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. जानेवारीपासून चीनच्या आयात आणि निर्यात यामध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

- Advertisement -

रविवारी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार धरावे आणि त्यांच्यावर कारवाई निश्चित करावी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांनी चीनवर निशाणा साधल्याची टीका केली आहे. ते म्हणतात की, चीन हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. डीएचएसच्या विश्लेषणात म्हटलं आहे की, कोरोना विषाणूची तीव्रता लपविताना चीनने आयात वाढविली आणि वैद्यकीय पुरवठ्यांची निर्यात कमी केली. या प्रकरणाची माहिती देताना त्यांनी निर्यातीवर बंदी घालण्यास नकार दिला.


हेही वाचा – CoronaVirus: चीनने वुहानच्या प्रयोगशाळेतून शास्त्रज्ञांचे फोटो केले गायब

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -