मध्य रेल्वेवरील ‘मेगाब्लॉक’ रद्द; पश्चिमसह हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कायम

विविध तांत्रिक कामांसाठी आजचा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Railway mega block on Sunday 9 December
मेगाब्लॉक रद्द

रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी तिनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. परंतु, विविध तांत्रिक कामांसाठी आजचा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. सकाळी ११.२० वाजेपासून दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार होता पण तांत्रिक कारणांमुळे हा ब्लॉक रद्द करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. परंतु, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचे रविवारीच्या दिवशी हाल होणार आहेत.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे असा हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

अप मार्ग – सकाळी ११.१० ते दु. .४० आणि डाऊन मार्ग सकाळी ११.४० ते दु. .१० वाजेपर्यंत घेण्यादत येणार आहे.

परिणाम – सीएसएमटी ते वाशी, सीएसएमटीबेलापूर आणि सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरील गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळे पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार असून ब्लॉक काळात सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वे आणि मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धिमा मार्गावर पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम – अप व डाऊन धिम्या मार्गावरील गाड्य़ा सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. राम मंदिर स्थानकात गाड्या थांबणार नाहीत. तसेच काही उपनगरीय गाड्या ब्लॉकदरम्यान रद्द करण्यात येतील.