घरमुंबईमुंबई मॅरेथॉनमध्ये ३२०० धावपटूंवर वैद्यकीय उपचार

मुंबई मॅरेथॉनमध्ये ३२०० धावपटूंवर वैद्यकीय उपचार

Subscribe

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे स्पर्धकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ४६ हजार ४१४ स्पर्धकांपैकी ३२०० स्पर्धकांवर उपचार करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांत वैद्यकीय उपचार लागणाऱ्या धावपटूंची संख्या कमी होत आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे स्पर्धकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये सर्वात जास्त डिहायड्रेशनच्या केसेस आढळल्या आहेत.

स्पर्धकांना डिहायड्रेशनचा त्रास झाला

४१ स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्यांना तात्काळ उपचार देण्यात आले. तर, काहींना गुदमरणे, पायाला चमक मारणे अशा तक्रारी आढळल्या. त्यांच्यावर फिजिओथेरपी करुन त्यांना उपचार देण्यात आले. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे ११ मेडिकल केंद्र आणि २ मेडिकल उपचारांसाठी केंद्र उभारण्यात आले होते, अशी माहिती एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय डिसिल्वा यांनी दिली आहे.

- Advertisement -

केनियाचा कॉसमस लॅगट विजेता

दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मुंबई मॅरेथॉन आज झाली. यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉनचं हे १६ वं वर्ष होतं. मॅरेथॉनमध्ये एकूण ४६ हजार ४१४ धावपटूंनी सहभाग घेतला. टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटूंसह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मुंबईकरांमध्ये आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन २०१९ चा विजेता ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू विजयी ठरली आहे. मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी ठरले आहेत.

हेही वाचा – 

- Advertisement -

टाटा मुंबई मॅरेथॉन २०१९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -