घरमुंबईप्रदुषणामुळे शहरात श्वसन आणि हृद्यरोग रुग्णांमध्ये वाढ

प्रदुषणामुळे शहरात श्वसन आणि हृद्यरोग रुग्णांमध्ये वाढ

Subscribe

रासायनिक प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करत होत नसल्याने ही समस्या त्रासदायक ठरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

शहर प्रदुषणाबाबत राज्यात दुसरा क्रमांकावर असल्याचे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत. रासायनिक प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करत होत नसल्याने ही समस्या त्रासदायक ठरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या शहरात श्वसन आणि हृद्यरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ आणि त्यापाठोपाठ किडनीव्याधी आणि कर्करुग्णात वाढ होत असल्याची माहिती डॉ. सुदर्शन पाटील यांनी दिली.

रुग्णांना मोफत सल्ला

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आय)चे प्रभाग क्रमांक ५८ मधील नगरसेवक तथा गटनेते नंदू म्हात्रे आणि सत्यसाई ल्पॅटीनम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामानाने रविवारी पश्चिमेकडील गिरनार बंगला येथे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. पाटील यांनी उपस्थित नागरिकांना उपचार आणि मार्गदर्शन दिले. यावेळी मानोपचारतज्ञ डॉ. निलेश बारस्कर यांनीहि रुग्णांना मोफत सल्ला दिला. कॉंग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचा प्रभागातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. ई.सी.जी., रक्तदाब, मधुमेह, हृद्यरोग, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, मुत्ररोग आणि बी.एम.आय इत्यादीच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मोफत सोनीग्राफी, एक्सरे, २ डी इको आदि तपासण्या करण्यात आल्या. तर अॅन्जीओग्राफी, बायपास, किडनीस्टोन शस्त्रक्रिया, व्हॉल्व रिप्लेसमेंट, फ़्रॅक्चर आणि प्रोस्टेट सर्जरी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील असे नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी सांगितले.

- Advertisement -

केमिकलच्या वासाने नागरिक त्रस्त

डॉ. सुदर्शन पाटील म्हणाले की,”शहर प्रदूषणग्रस्त अशी चर्चा सुरु आहे. शहराजवळी ग्रामीण भागात केमिकलच्या वासाने नागरिक हैराण झाले आहेत. येथील प्रदूषणाचा परिमाण नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे श्वसन आणि हृद्यरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याखालोखाल किडनी व्याधी आणि कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. दैंनदिन आहाराकडे लक्ष देऊन बाहेरील फास्टफूड खाऊ नये. तर मानोपचारतज्ञ डॉ. निलेश बारस्कर यांनी धावपळीच्या जीवनात आणि त्यामुळे वाढत असलेल्या ताणतणावावर `रिल्यॅकस` आणि तणावमुक्त वातावरण हे सुखी आणि आनंदी जीवनाचा मंत्र आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -