घरताज्या घडामोडीमुंबई हादरली, तेरा वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या!

मुंबई हादरली, तेरा वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या!

Subscribe

मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी एका १३ वर्षीय मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.

मुंबईतील मालवणी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षाच्या मुलाची शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाने गळा चिरून हत्या केली आहे. याच परिसरातील निर्जन ठिकाणी तीचा मृतदेह सापडला. या हत्येप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

विद्यानंद यादव (वय १३) असं मृताचं नाव आहे. आरोपी करण बहादूर (वय २३) हा शेजारीच राहतो. तो रिक्षाचालक आहे. यादव कुटुंबीय आणि बहादूर याचं छोटीशी भिंत बांधण्यावरून वाद झाला होता. यातून हे हत्याकांड घडलं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी एका १३ वर्षीय मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या हत्येचा छडा पोलिसांनी लावला असून, शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. लॉकेट, कपडे आणि चपलांवरून मृतदेहाची ओळख पटली आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. बहादूरने विद्यानंदला रिक्षा चालवायला शिकवतो असं सांगून मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी नेलं. तिथं त्याचा धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली

- Advertisement -

लॉकेटवरून लागला शोध

मालवणीतील जोगई वाडी रस्त्यालगतच्या परिसरात एका मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती शुक्रवारी दुपारी नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलीस घटनास्थळी तातडीनं पोहोचले. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी जवळील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला.

मुलाच्या शरीरावर एक लॉकेट सापडलं. तसंच कपडे आणि चपलांवरून मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास मदत झाली. अशाच वर्णनाचा एक १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आरे पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर आम्ही कुटुंबीयांशी संपर्क साधला

- Advertisement -

कुटुंबाकडे चौकशी केली असता शेजारी राहणाऱ्या करण बहादूर याच्यासोबत किरकोळ भांडण झालं असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी लगेचच बहादूरला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली. या प्रकरणी बहादूरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – Video : रमचा पेग मारा, अंडी खा कोरोनाला पळवा- काँग्रेस नेत्याचा अजब सल्ला!


एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -