घरमुंबईआणि 'ती' दुर्गेच्या रुपात धावून आली

आणि ‘ती’ दुर्गेच्या रुपात धावून आली

Subscribe

मुंबई पोलीस शिपाई मनीषा विसपुते यांच्या प्रसंगावधानामुळे पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावणाऱ्या किरण सांगळे यांचे प्राण वाचवले आहेत.

आज नवरात्रीच्या पहिला दिवस असल्याने सगळीकडेच जय्यत तयारी दिसून येत आहे. देवीचा जागर होणाऱ्या या नऊ दिवसांच्या पहिल्याच दिवशी मुंबई पोलीस दलातल्या नवदुर्गेचे दर्शन झाले आहे.

नेमके काय घडले?

वांद्रे परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस शिपाई मनीषा विसपुते यांच्या प्रसंगावधानामुळे आरे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावणाऱ्या किरण सांगळे यांचे त्यांनी प्राण वाचले आहेत. मनीषा विसपुते ह्या पोलीस शिपाई म्हणून मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्या तरी नुकतेच महिला पोलिसांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिल्यामुळे त्या चालक म्हणूनसुद्धा कार्यरत आहेत.

- Advertisement -

१० ऑक्टोबर रोजी सकाळी विसपुते आपली ड्युटी संपवून घरी परतत होत्या त्यावेळी वांद्रे परिसरातील पश्चिम द्रुतगती मार्गावर रेल्वे ब्रिज आणि अँटीचैन स्नचिंग पॉइंटवरून घरी परतत असताना एक मोटारसायकल चालक आपली गाडी थांबवून अचानक खाली बसल्याचे त्यांनी पाहिले. काळजीपोटी नक्की काय झालं हे पाहण्यासाठी त्यानी त्यांच्या जवळ विचारपूस केली असता ते पोलीस हवालदार किरण सांगळे असून त्यांच्या छातीत कळ आल्याने ते अचानक खाली बसल्याचे त्यांना समजले. कसलाही विचार न करता मनीषा विसपुते यांनी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षास कळवून खेरवाडी पोलीस ठाण्याची ५ नंबरची मोबाईल व्हॅन बाहेर काढत त्यामध्ये सांगळे यांना बसवून अंधेरीतील सेवन हिल हॉस्पिटल गाठले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने पोलीस हवालदार किरण सांगळे यांचे प्राण वाचले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मुंबई पोलीस दलातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी काही दिवसांपूर्वीच गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामधून मनीषा विसपुते यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या या कौशल्याने आज एका हवलदाराचे प्राण वाचवण्यात आल्याने खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

८.३० च्या सुमारास मी माझी ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी निघत होते. तोच मला हवालदार किरण सांगळे मोटरसायकवरून उतरून अस्वस्थतेने खाली बसताना दिसले. मला शंका आल्याने मी त्यांच्या जवळ जाऊन चौकशी केली असता. त्यांच्या छातीत कळ आल्याने त्यांना दवाखान्यात नेणें गरजेचे आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून मी वरिष्ठांची परवानगी घेऊन पोकिस स्टेशनच्या गाडीतून त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवले. त्यांचे प्राण मला वाचवता आले याच मला समाधान वाटत आहे.  – मनीषा विसपुते, पोलीस शिपाई, खेरवाडी पोलीस स्टेशन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -