घरमुंबईअभिनेत्री तनुश्री दत्ता ओशीवरा पोलीस ठाण्यात हजर

अभिनेत्री तनुश्री दत्ता ओशीवरा पोलीस ठाण्यात हजर

Subscribe

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर विरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आज कारवाईला सुरुवात केली आहे. यासंबंधी आज तनुश्री दत्ता जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईतील ओशीवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. २००८ साली हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नानाने आपल्याशी गैरवर्तन केले असून आपला विनयभंग केल्याचा आरोप तिने या तक्रारीत केला आहे. याचसंबंधी आज, बुधवारी सायंकाळी तनुश्री दत्ता ही जबाब नोंदवण्यासाठी ओशीवरी पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. तनुश्रीने नाना पाटेकरसह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली होती.

वाचा : तनुश्रीने केली ओशीवरा पोलीस ठाण्यात तक्रार

- Advertisement -

नानाचीही पोलीस ठाण्यात हजेरी 

तनुश्री दत्ताच्या तक्रारीवर ओशीवरा पोलिसांची कार्यवाही सुरु. नाना पाटेकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांनाही पोलीस स्थानकात पाचारण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडिमध्ये सुरु असलेल्या तनुश्री विरुद्ध नाना हा मुद्दा आता कायद्याच्या कचाट्यात आला आहे. तनुश्रीने कायदेशीररित्या पोलिसांत तक्रार नोंदवून आता न्याय मिळवण्याच्या मार्गाने पहिले पाऊल टाकले आहे. तर नाना पाटेकर यांनीही त्यांच्या वकिलांच्या मार्फत तनुश्रीला नोटीस बजावली आहे. दोघांच्या जबाबातून कोणता निष्कर्ष समोर येईल, हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

वाचा : ‘मैत्रिणींनो खरं बोला, #Metooचा गैरफायदा नको’

- Advertisement -

तनुश्रीच्या आरोपानंतर भारतात मी टूचे वादळ 

तनुश्रीने तब्बल १० वर्षांपूर्वीचा घटना उघडकीस आणल्यानंतर भारतात मीटू मोहिमेला सुरुवात झाली. सिने क्षेत्रातील कित्येक महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्याय, अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांचा उल्लेख करत आपणही या छळाला सामोरे गेलो असल्याचे सांगितले. एक प्रकारे मीटूची चळवळ भारतात उभी राहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -