घरमहाराष्ट्रस्वतःसोबत आणखी एक मतदारसंघ निवडून आणा; मुख्यमंत्र्यांचे टार्गेट

स्वतःसोबत आणखी एक मतदारसंघ निवडून आणा; मुख्यमंत्र्यांचे टार्गेट

Subscribe

सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंत स्मृती येथे भाजप आमदार-खासदार यांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीत स्वतःच्या मतदार संघासोबतच दुसराही मतदार संघ निवडून आणण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

आराम झाला असेल तर कामाला लागा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे यावेळी आमदारांना त्यांच्या चार वर्षाच्या कामाचे रिपोर्ट कार्ड देत आराम झाला असेल तर आता तरी कामाला लागा असे, आदेश दिले आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीत मतदारसंघांमध्ये कोणकोणते समाज भाजपच्या बाजूने आहेत, कोणते विरोधात जाऊ शकतात, आमदारांबद्दल नेमकी नाराजी आहे काय? आमदाराच्या कुठल्या कामांवर मतदार खुश आहेत, याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

मंगळवारी झालेल्या बैठकीत भाजपा आमदारांना स्वतःच्या मतदारसंघासोबत आणखी एक मतदारसंघ निवडणूक आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -