घरमुंबईफेसबुकच्या मदतीने घेतला मुलीचा शोध

फेसबुकच्या मदतीने घेतला मुलीचा शोध

Subscribe

मानव तस्करी विरोधी पथकाने फसबुकची मदत घेऊन २० वर्षीय तरुणीला तब्बल तीन वर्षांनी शोधण्यास मिळाले यश.

हरवलेल्या लोकांना शोधून घेण्यासाठी हल्ली सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेकजण फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि इतर साईट्सवर आपले खाते सुरु करत आहेत. त्यामुळे बहूतांश नागरिक सोशल मीडियाचा वापर करतांना दिसत आहेत. सोशल मीडियाचा वाढता वापराचा फायदा पोलिसांना हरवलेल्यांना शोधण्यास ही होत असल्याची घटना नुकतीच नवी मुंबईतील खारघर येथे घडली. खारघर परिसरातील एका आश्रमातून हरवलेली मुलगी फेसबुकमुळे पोलिसांना सापडली. तब्बल तीन वर्षांनी या मुलीचा शोध लागला असल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले.

घटनेबाबत विस्तारित माहिती

खारघर येथील एका अनाथ आश्रमात रहाणारी मुलगी मागील तीन वर्षांपासून बेपत्ता झाली होती. आश्रममधून बेपत्ता झाल्यानंतर याची तक्रार आश्रमाने पोलिसांकडे नोंदवली होती. मुलगी हरवली किंवा आश्रमसोडून गेली याबाबत प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर निर्माण झाला. पोलिसांनी त्यावेळी तक्रार नोंदवली होती. मात्र मुली संबधी कोणताही फोन किंवा कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तीन वर्षांनंतर पोलिसांनी फेसबुक तपासले तेव्हा या मुलीच्या चहेऱ्याशी साम्य असलेला फोटो त्यांना सापडला. या प्रोफाईलटची अधिक तपासणी केल्यानंतर पोलिसांची खात्री झाली.

- Advertisement -

या मुलीशी चौकशी केल्यानंतर तिने स्वखूषीने आश्रम सोडल्याची कबुली दिली. तीन वर्षापूर्वी यामुलीला एक महिला भेटली होती. तिने या मुलीला आपल्या एनजीओमध्ये काम करण्याची संधी दिली. मागील तीन वर्षांपासून ही मुलगी वांद्रे येथील एनजीओमध्ये काम करत होती. आश्रमात रहाण्याचा कंटाळा अल्यामुळे तिने आश्रम सोडल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नसून ही केस पोलिसांनी बंद केली असल्याचे सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -