घरमुंबईसागरी किनारपट्टीवर वादळाचे संकट

सागरी किनारपट्टीवर वादळाचे संकट

Subscribe

मुंबईसह रायगड, पालघरला अलर्ट

दक्षिण अरबी समुद्रात शनिवारी १५ मे येऊ घातलेल्या चक्रीवादळाने सागरी किनारपट्टीला धोका संभवत असल्याने मुंबईसह रायगड, पालघरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यामध्ये सुमारे ७० किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्याच गतीने लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह रायगड, पालघरला बसण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील रहिवाशांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रात येत्या १४ मे ते १६ मे दरम्यान हे वादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख असलेल्या महाराष्ट्र, केरळ, गुजरातही या वादळाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा केंद्र म्यानमार असून, या वादळाला त्या देशाने टाँकटाइ असे नाव दिले आहे. गुजरात किनारपट्टीचीही मोठी हानी या वादळात होण्याची दाट शक्यता आहे. गुजरात किनारपट्टीवरील वादळाच्या तीव्रतेवर कोकण किनारपट्टीवरील संकट अजमावले जाईल.

- Advertisement -

म्यानमारकडून वादळाची आगेकूच सुरूच असून तिथे सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. टाँकटाई या वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर राहणार्‍या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षातील हे पहिले वादळ असून, राज्यात कोरोनाच्या संकटातच हे संकट चालून आल्याने यंत्रणेवर याचा मोठा ताण येईल, असे सांगितले जाते. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना निसर्ग वादळाचा सामना करावा लागला होता. निसर्ग वादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान सोसावे लागले होते. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवर पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

१४ मे ते १६ मे २०२१ या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांना वादळाचा तडाखा बसेल तर १६ मे रोजी तो महाराष्ट्र, गोवा किनार्‍यावर तो धडकेल. किमान तीन दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने किनारपट्टीवरील मासेमारी रोखण्याच्या सूचना मेरीटाईम बोर्डाला देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -