घरमुंबईरेल्वे प्रकल्पांना संजीवनी मिळणार ?

रेल्वे प्रकल्पांना संजीवनी मिळणार ?

Subscribe

मुंबईकरांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे

मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई रेल्वे प्रकल्पाला, या तरी अर्थसंकल्पात संजीवनी मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुद्धा १ फेब्रुवारीला म्हणजे आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र मागच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ ए प्रकल्पासाठी ५४ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही तोच निधी मिळालेला नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात फक्त निधीची घोषणा नको तर त्याची प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.

मुंबई लोकल सेवेच्या विकास कामासाठी महत्त्वाचा भाग ठरणारा मुंबई शहर वाहतूक प्रकल्प ३-ए (एमयूटीपी ३-ए) या प्रकल्पाचा आराखडा ५४ हजार ७७७ कोटी रुपयांचा आहेत. गेल्या अर्थसंकल्पात ५४ हजार कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ ए ला मंजुरी मिळाली होती. सध्या या प्रकल्पाला कॅबिनेटमधून अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अडकून पडला आहेत. तसेच एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-३ प्रकल्पाला डिसेंबर २०१६ रोजी मंजुरी मिळाली. रेल्वे, राज्य सरकारबरोबरच बँका व वित्त संस्थांकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. फक्त अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र वास्तवामध्ये सरकारकडून निधी मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रकल्पांचा खर्च करोडोंच्या घरात जात आहे. सोबतच अनेक कामे पुढे सरकू शकलेली नाहीत. त्यामुळे सरकारच्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

चॉकलेट देणे बंद करा                                                                                                    मुंबईमध्ये एसी लोकल सुरू झाली असून आगामी काळात मुंबईत ४७ एसी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या पूर्वीच एसी लोकल तोट्यात असून याचे भाडे सर्व सामान्य प्रवाशांना परवडणारे नाही. रेल्वे मंत्री सामान्य मुंबईकरांसाठी घोषणा करतात. मात्र वास्तविकतेमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. लोकल फेर्‍या वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच लोकलचा वेग मंदावला आहे. तसेच दोन मोठे प्रकल्प होती घेण्यात आले आहेत.मात्र त्याची अंलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात सामान्य मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पाचा काय फायदा राहिलेला नाही. फक्त निवडणुका आल्याने अर्थसंकल्पाच्या नावावर प्रवाशांना चॉकलेट देण्याचे काम रेल्वेकडून करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहेत.

रेल्वेच्या विकास कामांसाठी सुरू केलेले एमयूटीपी-३ आणि एमयूटीपी-३-ए या प्रकल्पाचे काम निधीअभावी रखडून पडले आहे. यासाठी या अर्थसंकल्पांसाठी निधी देण्यात यावा. तसेच फक्त निधी देऊन चालणार नाही तर त्याची वेळेत अंलबजावणी करण्यात यावी. निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढत जात आहे.  सुभाष गुप्ता- अध्यक्ष, रेल परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -