घरमुंबईदहा हजार कोरोना मृत्यू, मुंबईचा नवा रेकॉर्ड

दहा हजार कोरोना मृत्यू, मुंबईचा नवा रेकॉर्ड

Subscribe
कोरोनाच्या महामारीच्या संकटात गेल्या सहा महिन्यांपासून जगभरातील देश या आजाराची झुंज देत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवताना काही देशांचे या आजारावर आळा घालण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. भारतातही कोरोनाचा ९० टक्के रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. पण देशात मुंबई शहराने कोरोनाच्या आकडेवारीत एक नवा उच्चांक गाठला आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाने मृत्यू झाल्याचा आकडा आता १० हजारांवर पोहचला आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाने मृत्यू झालेले ८५ टक्क रूरूग्ण हे ५० वर्षांहून अधिक वयाचे होते.
केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ९० टक्के रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामध्ये ६१ टक्के रूग्ण हे ६ राज्यातले तसेच केंद्रशासित प्रदेशातील आहेत. कोरोनाचा सर्वाधिक कहर झालेल्या राज्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. पण या सगळ्या राज्यात मुंबई शहर अव्वल स्थानावर आहे. एकट्या मुंबईने कोरोनाचा १० हजार बळी घेतले आहेत. त्यामध्ये ६० टक्के रूग्ण हे ५० हून अधिक वय असलेले आहेत.
शनिवारी मुंबईत १२५७ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली. तर गेल्या २४ तासांमध्ये ५० हून अधिक रूग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या आकडेवारीतून मुंबईने आता १० हजार मृत्यूचा आकडा पार केला आहे. मुंबईत आतापर्यंत २ लाख ५० हजार कोरोना संक्रमण झालेले रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ लाख २१ हजार ५३८ रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. तर १७ हजार ९७७ रूग्णांवर अजुनही उपचार सुरू आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोना रिकव्हरीचा दर हा ८८ टक्के इतका आहे. तर कोरोना वाढीचा दर हा ०.५८ टक्के आहे. मुंबईत आतापर्यंत १४ लाख ३७ हजार ४४५ सॕम्पल्सची कोरोना चाचणी झाली आहे. त्यामध्ये डबलिंगचा दर हा १२० दिवसाचा आहे. तर मुंबई शहरात एकूण  ६३३ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये ८५८५ बिल्डिंग सील करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -