घरमुंबईमुंबईत आता टॅक्सीवाल्यांनी भाडं नाकारलं, तर परवानाच रद्द होणार!

मुंबईत आता टॅक्सीवाल्यांनी भाडं नाकारलं, तर परवानाच रद्द होणार!

Subscribe

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे नाकारल्यास आता आरटीओच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदावली असता तात्काळ त्या तक्रारीची अंमलबजावणी करणार आहेत. आता पर्यंत एकूण १५९५ तक्रारी दाखल असून, त्यामधील ७ ५८ चालकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे गजबजले शहर आहे. याठिकाणी बाहेरून कामकरण्यासाठी, उद्योगासाठी नागरिक येत असतात. मुंबईतील लोकसख्यां वाढत आले, त्यामुळे शहारामध्ये गर्दी वाढून वाहतूक कोंडी होत आहे. पुर्णपणे मुंबईकर या कोंडीमध्ये पिचले जात आहेत. तसेच कामाला जाणाच्या घाईमध्ये काहीवेळा रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारतात. यामुळे मुंबईकरांची गैरसोय होताना दिसते. मात्र, आता कोणत्याही चालकांने भाडे नाकारले असता त्या चालकाची तक्रार आरटीएओ टोल फ्री क्रमांकावर दाखल केल्यास तात्काळ त्याची दखल घेतली जाणार आहे. तसेच आरटीओ त्या संबंधित चालकाचे लायसन रद्द करणार असल्याची माहिती स्पष्ट होत आहे.

तक्रारी दाखल

काही वर्षापूर्वी आरटीओ टोल फ्री क्रमांक त्यांनी सुरू केला आहे. एकूण १५९५ तक्रारी आरटीओकडे आता पर्यंत आल्या आहेत. तर आरटीओकडे ७८८ निकाली काढल्या आहेत, तर ७५८ चालकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. १८००-१२०-८०४० हा आरटीओ तक्रार नोंदीचा टोल फ्री क्रमांक आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांचे बॅच नसणे, गणवेश नसणे, तसेच भाडे नाकारणे, अशा तक्रारी आरटीओ टोल फ्री क्रमांकावर केली जाते. आरटीओने स्पष्ट केले आहे की, टोल फ्री क्रमांकावर सर्वात जास्त तक्रारी आल्या असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

येवढ्या चालकांवर केली कारवाई

मुंबई येथील वडाळा येथील आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सीच्या ९९९ तक्रारी आल्या आहेत. तसेच त्या तक्राऱ्यांपैकी ४८५ तक्रारी वडाळा आरटीओ यांनी निकाली काढल्या आहेत. तसेच करावाई करत असताना ४९५ लायसन्स त्यांनी रद्द केले आहेत. तसेच ९९९ तक्रारींमध्ये ७०८ रिक्षा चालक आणि २९१ मीटर टॅक्सी यांचा समावेश आहेत. तसेच चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वडाळा आरटीओने दोषी चालकांकडून १२ लाख ८८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच ताडदेव आरटीओने आता पर्यंत ७ लाख ५२ हजार ७०० रूपयांची दोषी चालकांकडून वसूल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -