घरमुंबईपदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया वेळापत्रकात बदल

पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया वेळापत्रकात बदल

Subscribe

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठाने प्रवेशपूर्व नावनोंदणी प्रक्रियेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनांसाठी दिलासा देणारा हा निर्णय ठरणार आहे. ३० मे २०१८ ला १२ वीचा निकाल लागला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या गुणपत्रिका १२ जून २०१८ पासून उपलब्ध होणार आहेत. दरम्यान प्रवेशपूर्व प्रक्रियेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्यांनी केली होती. विद्यार्थी केंद्रीत निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रवेशपूर्व नावनोंदणी प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकाची विद्यार्थ्यांनी आणि संबंधीत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नोंद घेण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी केले आहे.

१ जून २०१८ पासून सुरु करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेसाठी आतापर्यंत १ लाख १४ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी २ लाख ९७ हजार ७५९ अर्ज केले आहेत.

- Advertisement -

जुने वेळापत्रक
अर्ज विक्री – ३१ मे ते १८ जून
प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया – १ जून ते ११ जून
प्रवेश अर्ज महाविध्यालयात सादर करण्याची तारीख – ७ जून ते १२ जून
पहिली मेरिट लिस्ट – १२ जून
प्रमाणपत्र पडताळणी आणि शुल्क भरणे – १२ जून ते १५ जून
दुसरी मेरिट लिस्ट – १५ जून
प्रमाणपत्र पडताळणी आणि शुल्क भरणे – १८ जून ते २० जून
तिसरी मेरिट लिस्ट – २० जून
प्रमाणपत्र पडताळणी आणि भरण्याची तारीख – २१ ते २५ जून

नवीन वेळापत्रक
अर्ज विक्री – ३१ मे ते १८ जून
प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया – १ जून ते १८ जून
प्रवेश अर्ज महाविध्यालयात सादर करण्याची तारीख – १३ जून ते १८ जून
पहिली मेरिट लिस्ट – १९ जून
प्रमाणपत्र पडताळणी आणि शुल्क भरणे – २० जून ते २२ जून
दुसरी मेरिट लिस्ट – २२ जून
प्रमाणपत्र पडताळणी आणि शुल्क भरणे – २५ जून ते २७ जून
तिसरी मेरिट लिस्ट – २७ जून
प्रमाणपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची तारीख – २८ ते ३० जून

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -