घरमुंबईबेस्ट भाडे कपातीमुळे मुंबईकर खूश

बेस्ट भाडे कपातीमुळे मुंबईकर खूश

Subscribe

भाडे कपातीच्या निर्णयाचे मुंबईकरांनी केले स्वागत

गेल्या काही दिवसांपासून बेस्ट भाडेकपातीची मुंबईकरांना प्रतिक्षा लागली होती. अखेर राज्य सरकारने सोमवारी बेस्ट भाडेकपातीला हिरवा झेंडा दाखवला आणि मंगळवारपासून बेस्टची ऐतिहासिक भाडेकपात लागू झाली. मंगळवार हा भाडेकपातीचा पहिला दिवस होता. त्यामुळे एरवी बेस्ट बसची वाट पाहणार्‍या प्रवाशांच्या चेहर्‍यांवर आनंद दिसून येत होता. बेस्टचा प्रवास फक्त पाच रूपये अशा घोषणा प्रवाशांच्या कानावर पडताच अनेक प्रवाशांनी बेस्टच्या बसकडे धाव घेतली. त्यामुळे बेस्ट बसगाड्या प्रवाशांनी भरुन जात असल्याच चित्र दिसत होते.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या बेस्टला मुंबई महापालिकाने ६०० कोटींची मदत करून बेस्टला संजीवनी दिली. मात्र मुंबई महानगरपालिकाने बेस्ट प्रशासनात काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. या अटी आणि शर्तीमध्ये बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला देण्यात आले. या दरकपातीमुळे प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच आहेत. तसेच बेस्टने सामान्य बसेस व्यतिरिक्त एसी बसेसच्या किमान भाड्यातही कपात केलेली आहे. एसी बसेसचे भाडे ६ रूपये करण्यात आले आहे. यापूर्वी एसी बसेससाठी १५ रूपयांचे किमान भाडे आकारण्यात येत होते. बेस्टच्या प्रवाशांनी बेस्ट आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.

- Advertisement -

बेस्टच्या भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी बेस्टला तुफान साथ दिली खरी, मात्र ही साथ टिकवायची असेल बेस्टला नियमित बस फेर्‍या वाढवाव्या लागतील. जे बेस्ट मार्ग बंद केले आहेत. ते सुरू करण्यात यावे, जेणेकरुन सर्वसाम्यान मुंबईकरांना यांच्या फायदा होईल.
– पृथ्वीराज चव्हाण, प्रवासी

बेस्ट आणि महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट व्हायची. मात्र आता त्यांना मुबलक दरात प्रवास करणे शक्य होणार आहे.
– तश्वर पटेल, प्रवासी

- Advertisement -

बेस्ट भाडे कपातीच्या निर्णय सर्वसामान्यासाठी दिलासा देणारा आहेत. लोक एका चौकातून दुसर्‍या चौकात जाण्यासाठी दुचाकी काढायचे किवा पायी जायचे, मात्र आता ते सुध्दा बेस्टचा वापर करतील.
-दिपक सपकाळ -प्रवासी

बेस्टची भाडे कपात झाल्याची माहिती अनेक प्रवांशाना नाही. त्यामुळे यावर जन जागृती होणे गरजेचे आहे. तसेच बेस्टने गाड्यांची संख्या वाढवावी.
– आर.टी. डोमरे, प्रवासी

महिला बाजारात किंवा मुलांना शाळेत सोडण्याकरिता टॅक्सी आणि रिक्षाचा वापर करत, आता बेस्ट बसगाडीचा वापर करतील, फक्त बेस्ट प्रशासनाने सुट्ट्या पैशाची समस्या सोडवावी.
– श्वेता सावंत, महिला प्रवासी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -