घरमुंबईमुंबईतील पहिलं रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर सुरू

मुंबईतील पहिलं रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर सुरू

Subscribe

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मुंबईतील पहिलं रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया सेंटर सुरू करण्यात आलं आहे. ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या सेंटरचं उद्घाटन अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं.

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मुंबईतील पहिलं रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया सेंटर सुरू करण्यात आलं आहे. ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या सेंटरचं उद्घाटन अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत एका पाठोपाठ २ रोबोटिकच्या माध्यमातून सांधेरोपण शस्रक्रिया करण्यात आल्या. यात ६५ वर्षाच्या कांचन पाटील या ५ वर्षांपासून गुडघेदुखीने त्रासल्या होत्या. गुढघ्यावर झालेल्या नॅव्हीओ पीएफएस रोबोटिक्स सर्जिकलच्या माध्यमातून त्या शस्त्रक्रियेच्या चार तासांच्या आत चालू लागल्या.

पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा फायदेशीर

रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा नक्कीच फायदेशीर आहे. या रोबोटिक असिस्टेड शस्रक्रियेत अधिक अचूकता, कमीत कमी रक्तस्राव, लवकरात लवकर बरे होण्याची खात्री आणि बदललेल्या कृत्रिम सांध्यात मिळणाऱ्या नैसर्गिक हालचाली असे अनेक फायदे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळतात. “ रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा नक्कीच फायदेशीर आहे.” असे ऑर्थोपेडिक सर्जन आणि विभाग प्रमुख डॉ. तेजस उपासनी यांनी सांगितलं.

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रातील या महत्वाच्या बदलाने आयुष्य वाढवले आहे, हे विज्ञानाची सिद्धी आहे वैदकीय शास्त्रात झालेली प्रगती व नव-नव्या सोयी व उपकरणांमुळे मोठ मोठ्या आजारांवर आळा घालण्यास मदत होते.
– अतुल कुलकर्णी, अभिनेता

रुग्णांसाठी एक वरदानच

या शस्त्रक्रिये नंतर रुग्ण २-३ दिवसात घरी जाऊ शकतो. मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिकच्या सहाय्याने दूर करणे आणि रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्य झाले आहे. एक-दोन दिवसातच घरी चालत जाऊ शकतात, यामुळे रुग्णालयात राहण्याचा अतिरिक्त खर्चदेखील कमी होतो. तसेच वेदना खूपच कमी झाल्याने वेदनाशामक औषधांचा वापर कमी होतो. रुग्ण स्वतःच हिंडू-फिरू शकल्याने शस्रक्रियेनंतर फिजिओथेरपीची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे, रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी एक वरदानच ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -